अप्पर डेपोमधून शिवाजीनगरकडे जाणा-या पीएमपीचा ( एमएच १४ सीडब्लू १७२३) ब्रेक निकामी झाल्याने या पीएमपीने कोल्ड्रिंकने भरलेल्या टेम्पोला जोरात धडक दिली. कोल्ड्रिंकचा टेम्पो दुस-या मालवाहतूक करणा-या टेम्पोला जाऊन धडकला. यानंतर हा मालवाहतूक करणारा टेम्पो सुखसागरनगरला जाणारी पीएमपीला (एमएच १२ एफसी ९४७) धडकला.

या धडकेत दोन बाईक पीएमपीच्या खाली गेल्या त्यातीलच एका बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. बिबवेवाडी पोलिसांनी तातडीने जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून क्रेनच्या सहाय्याने सर्व गाड्या बाजूला काढून पोलिसांनी रस्ता मोकळा करुन दिला आहे. हा अपघात घडला त्याचवेळी शाळेची बसदेखील त्या ठिकाणी आली होती. मालवाहतूक टेम्पोचा पुढील भाग पीएमपीच्या आत अडकल्यामुळे या स्कूल बसला समोरच्या बाजूने धडक बसली. सुदैवानं बसमधील विद्यार्थांना काहीही झालेले नाही.