HW News Marathi
मुंबई

भारतात प्रथमच दहा शहरांत ई-स्पोर्ट स्पर्धा होणार

मुंबई- पूर्वी निव्वळ पोरकटपणा म्हणून समजला जाणार ऑनलाइन गेमिंग स्पोर्ट आता प्रथमच देशाच्या तब्बल दहा मोठ्या शहरांत खेळला जाणार आहे. गेमिंग क्षेत्रातील अत्यंत लोकप्रिय असलेल्या कॉबेक्स कंपनीतर्फे देशपातळीवर ‘कॉबेक्स मास्टर्स २०१८’ या ऑनलाइन ई-स्पोर्ट्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षिस असलेली ही स्पर्धा सीएस-गो’ आणि ‘डोटा-२’ अशा दोन गटांत होणार आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता, पुणे, बेंगळुरु, हैद्राबाद, अहमदाबाद, जयपूर आणि कोहिमा या दहा शहरांमध्ये या स्पर्धेचा पहिला टप्पा ९ ते २९ एप्रिल या कालावधीत तर अंतिम टप्पा ९ मे ते १० जून या दरम्यान होणार आहे. भारतात ई-गेमिंग तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. या स्पर्धमुळे तरुणांना देशपातळीवर एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल तसेच या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होईल असे स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुजाहिद रुपानी यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भुजबळांच्या प्रकृतीत बिघाड, जसलोक रुग्णालयात केल दाखल

News Desk

पुण्यात आणखी एक हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस

News Desk

शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी गेलेल्या स्पीड बोटच्या अपघात १ जण बुडाल्याची भीती

News Desk