HW News Marathi
मुंबई

कुणाल कामराने राज ठाकरेंना ‘लाच’ देण्याचा प्रयत्न का केला?

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने केला. राज ठाकरेंची भेट घेण्याचे कारणही कुणाले ट्विटरवर शेअर केले आहे. त्याच्या नव्या ‘Shut Up Ya Kunal’ या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी तो कृष्णकुंजवर गेल्याचे त्याने या ट्विटरद्वारे सांगितले आहे. कुणाल कामराने शेअर केलेल्या या फोटोमध्ये कृष्णकुंज निवासस्थानाबाहेर उभा असून त्याच्या हातात एक पत्र ही दिसत आहे. त्याने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्या पत्राचा फोटोही शेअर केला आहे. या पत्रात लिहले आहे की, ‘तुमच्याबद्दल मी थोडी माहिती मिळवली ज्यात मला समजले की तुम्हाला किर्ती कॉलेजचा वडापाव आवडतो त्यामुळे मी तुम्हाला तुमचे आवडते खाणे देऊन लाच देण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरुन तुम्ही माझ्या Shut Up Ya Kunal’ या कार्यक्रमासाठी तुमचा थोडो वेळ काढून येण्याचा प्रयत्न कराल’, असे कुणाल कामराने या पत्रात म्हटले आहे.

 

इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात काही दिवसांपूर्वी कुणाल कामराने पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी आक्षेपार्ह वर्तन केल्यामुळे त्याच्यावर इंडिगो एअरलाईन्स, एअर इंडिया, स्पाईस जेट या विमान कंपन्यांनी बंदी घातली होती. या सगळ्या वादामुळे सध्या कुणाल कामराचे नाव प्रचंड चर्चेत तर होतेच आणि आता राज ठाकरेंच्या भेटीने आणखीनच चर्चेत येणार आहे. दरम्यान, आता कुणालच्या या कार्यक्रमाचे निमंत्रण मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वीकारणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांतची गर्लफ्रेंड रियाला धमकी देणाऱ्या दोघांवर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

News Desk

अभिनेता सुशांतसिंह सोबत काम केलेल्या एका अभिनेत्याने केली आत्महत्या

News Desk

उल्हासनगरमध्ये ‘स्पेशल 26’ चं रॅकेट उध्वस्त

News Desk