HW News Marathi
मुंबई

राज्यातील चतुर्थश्रेणी कर्मचारी संपावर

मुंबई- राज्यभरात कामगार रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कामगार वर्गाने आपल्या विविध मागण्यांसाठी रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सरकारने मागण्या मान्य करूनही त्याची अंमलबजावणी करण्यास होत असलेल्या दिरंगाईच्या कारणावरून राज्यातील सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाºयांनी संपाचे हत्यार उपसले आहे. सरकारच्या निषेधार्थ राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने गुरुवारी, शुक्रवार असे दोन दिवस संप पुकारला आहे. संपानंतरही सरकारने कोणतीही कार्यवाही केली नाही तर २७ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हिल) रुग्णालयातील राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांचा संप. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजाणीसाठी व विविध मागण्यांसाठी आंदोलनकर्त्या कर्मचा-यांनी गुरुवारी रुग्णालयाबाहेरच ठिय्या आंदोलन केले. शेकडो कर्मचा-यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परमबीर सिंह का नाही बनले मुंबईचे पोलीस आयुक्त ?

News Desk

2014 पर्यंतच्या अनधिकृत झोपड्या अधिकृत करा!

News Desk

कुर्ल्यात महापालिकेच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे रास्तारोको आंदोलन

News Desk