HW News Marathi
मुंबई

मुंबई उपनगर जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांसाठी मोफत वाहन सुविधा

मुंबई | ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९’ मध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होणे अधिक सुलभ व्हावे, विशेष सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मतदानाच्या दिवशी म्हणजेच २९ एप्रिल २०१९ रोजी दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत वाहन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अनुषंगाने दिव्यांग व्यक्तींची नाव नोंदणी करणे व आवश्यक ते समन्वयन साधण्यासाठी वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ‘दिव्यांग मतदार मदत केंद्राचे’ लोकार्पण जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने यंदा ‘दिव्यांग मतदारांसाठी सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य निश्चित केले आहे. त्यानुसार दिव्यांग मतदारांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाचीही तयारी सुरू आहे. याच तयारीचा भाग म्हणून मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘दिव्यांग मतदार मदत केंद्र’ सुरु करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत दिव्यांग मतदारांशी संपर्क साधण्याच्या कार्यवाहीचे समन्वयन केले जाणार आहे, तसेच तसेच दिव्यांग मतदार देखीलआवश्यकतेनुसार या केंद्रांशी संपर्क साधू शकणार आहेत.

दिव्यांग मदत केंद्राद्वारे दिव्यांग मतदारांशी संपर्क साधून त्यांना प्रशासनामार्फत मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्ह्यात यंदा दिव्यांग मतदारांची संख्या ४ हजाराहून अधिक असून त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय दिव्यांग मतदारांना आपल्या निवडणूक विषयक शंकांचे निरसन करण्यासाठी मदत केंद्रातील स्वतंत्र दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. यासाठी दिव्यांग मदत केंद्राच्या ९८६९-५१५-९५२, ८६५५-२३५-७१४ आणि ०२२-२६५१-००२० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

मतदान केंद्रांवर दिव्यांगांना रांगेशिवाय प्रवेश, संख्या अधिक असल्यास दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा, अधिक प्रकाश व्यवस्था, व्हील चेअर जाऊ शकेल असा मोठा दरवाजा, दिव्यांगांसाठी स्वतंत्र पार्किंग तसेच डोली आदी सुविधा देखील असणार आहेत. मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी दिव्यांग मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून एकही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जागृती मोहीमही राबविली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चार कोटीसह व्हॅन घेऊन चालक फरार

News Desk

पवई तलावातील जलक्रीडा सुविधेला मगरींचा अडथळा

News Desk

22 वर्षीय मुलीला आईनेच ढकलेल वेश्याव्यवसायात

News Desk