HW News Marathi
मुंबई

प्रियकरावर गोळीबार करून प्रियसीवर बलात्कार

टिटवाळा चिंचपाडा | नालंबी गांव रस्त्यावरील टेकडीवर रात्री 8च्या सुमारास गणेश नावाचा तरुण आपल्या प्रियसीसोबत दुचाकीवर बसुन बोलत होता. याचवेळी तेथून आलेल्या एका तरुणाने त्या दोघांना बंदुकीचे धाक दाखवत त्यांच्याकडुन पैशांची मागणी केली. त्यानंतर त्या प्रियकरांच्या छातीवर बंदुक ठेवत त्याला घाबरविले. तसेच त्या तरुणाच्या प्रियसीवर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यास प्रियकराने विरोध करताच बंदुकधारी लुटारुने त्या तरुणावर गोळीबार केला. त्यात त्या तरुणाचा जागिच मृत्यू झाला.

अंबरनाथ पश्चिम भागातील चिंचपाडा ते नालंबी हा रस्ता रात्रीच्या वेळी सामसुम असतो. हा रस्ता पुढे टिटवाळा रस्त्याला मिळतो. शहापूर अस्नोली गावात राहणारा तरुण गणेश दिनकर हा आपल्या प्रियसीसोबत अंबरनाथच्या नालंबी येथील रस्त्याच्या बाजुला बसला होता. गणेश हा शहापूरचा रहिवासी असला तरी आपल्या नातेवाईकाच्या चायनिजच्या दुकानात काम पाहत होता.

त्यामुळे त्याचे वास्तव्य अंबरनाथचेच होते. गणेश हा दुचाकी बुलेट घेऊन घरातुन बाहेर पडला. प्रियसीला सोबत घेऊन तो त्या डोंगरावर बसलेला असतांना एक तरुण मागुन आला. त्याने बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडुन पैशांची आणि बुलेटची चावी मागितली. त्यानंतर गणेशच्या प्रियसीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करण्यासाठी गणेश पुढे सरसावताच त्या लुटारुने त्याच्यावर गोळीबार करुन त्याला जखमी केले. त्यानंतर त्या तरुणीलाही बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार करुन पळून गेला असे पिडीत मुलीनेच स्पष्ट केले. आरोपी पळून गेल्यावर त्या तरुणीने येणा जाणा-यांकडे मदत मागितली.

त्यानंतर गावातील काही नागरिकांनी पोलीसांना या घटनेची माहिती दिली. घटना टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली असली तरी अंबरनाथ पोलीसांनी प्राथमिक तपास करुन गुन्हा त्यांच्याकडे वर्ग केला आहे. पुढील तपास टिटवाळा पोलीस करीत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टोलनाक्यावर प्रवाशाला ८७ हजाराचा फटका

News Desk

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

News Desk

कामा कामतही नंबर वन

News Desk