HW News Marathi
मुंबई

कलाप्रेमींसाठी खुशखबर ! २ फेब्रुवारीपासून सुरु होणार काळा घोडा फेस्टिव्हल

मुंबई | मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणारा अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध असा काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलचे यंदा २० वे वर्ष आहे. २ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या काळा घोडा फेस्टिव्हलचे यंदाचे वैशिष्ट्य काय हे जाणून घेण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलमध्ये यंदा महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने गांधीजींना मानवंदना देण्यात येणार आहे. केवळ देश नव्हे विदेशातही या फेस्टिव्हलचे अनेक चाहते आहेत. काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल हा कलाप्रेमींसाठी एक मोठी पर्वणीच आहे.

काळा घोडा फेस्टिव्हलचे वैशिष्ट्य

काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल १९९९ साली सुरुवात झाली. हा फेस्टिव्हल देशातील सर्वात मोठा सांस्कृतिक फेस्टिव्हल म्हणून ओळखण्यात येतो. काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल दरवर्षी साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या शनिवारी सुरू होतो. पुढचे ९ दिवस हा फेस्टिव्हल सुरु असतो. दर दिवशी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत हा फेस्टिव्हल सुरु असतो. या फेस्टिव्हलमध्ये असंख्य कलांसह फॅशन,सिनेमा, तंत्रज्ञान, विविध प्रकारचे वर्कशॉप ते अगदी खाद्यसंस्कृतीपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असतो. विशेष म्हणजे या फेस्टिव्हलमध्ये फिरण्यासाठी तुम्हाला कोणताही खर्च करावा लागत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

News Desk

बेस्ट कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचे आदेश

News Desk

रविवारी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही, प्रवाशांमध्ये उत्साह

swarit