HW News Marathi
मुंबई

छगन भुजबळ यांच्या प्रकृती बिघडल्यास सरकार जबाबदार | शरद पवार

मुंबई | गेल्या काही दिवसापासून माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबल यांची प्रकृती बिघडल्याच्या बातम्या येत आहेत. भुजबळ यांची काळाजी वाटल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला पत्र लिहले आहे.

या पत्रात त्यांनी म्हटले की, “योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यास त्यांच्या प्रकृतीला काही धोका निर्माण झाला, तर यांची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची असल्याचा इशारा शरद पवारांनी पत्रातून दिला आहे.”

गेल्या दोन वर्षापासून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबल वयाच्या ७१ व्या वर्षी तुरुंगात आहेत. पवार यांना दिवसेंदिवस भुजबळ यांची प्रकृती खालवत असल्याची माहिती मिळत असल्यामुळे त्यांना काळजी वाटू लागली आहे. पवारांच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणेशोत्सवाचं भक्तांचा उत्साह शिगेला

News Desk

आमदारांनाच गुंडाकडून धमकी – सुनिल प्रभू

swarit

भिवंडीत २६ मुलांना बिर्याणीतून विषबाधा

swarit