HW News Marathi
मुंबई

सरकारी योजना ,जनतेच्या योजना झाल्याविना यशस्वी होत नाहीत- मुख्यमंत्री

पुणे : राज्य शासनाने ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शेती’वर भर दिला आहे. मात्र सरकारी योजना या जनतेच्या योजना झाल्याशिवाय यशस्वी होत नाहीत. पानी फाऊंडेशनचे काम मोठे असून राज्य शासन या उपक्रमाच्या पाठिशी आहे. एका व्यक्तीने मनात आणल्यानंतर काय होऊ शकते, हे आमिर खानने दाखवून दिले आहे. जनतेनेही त्यांची ताकद या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवून दिली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.

‘पानी फाउंडेशन’च्या वतीने आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप २०१७’ स्पर्धचा पारितोषिक वितरण समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुलामध्ये झाला. अभिनेता शाहरूख खान, जलसंधारणमंत्री राम शिंदे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, पानी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ, रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमुख नीता अंबानी, जमनादेवी बजाज ट्रस्टचे राजीव बजाज, टाटा ट्रस्टचे आर. वेंकट, पिरामल फाऊंडेशनचे अजय पिरामल, एचडीएफडीसीच्या झिया लालकाका, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीणसिंह परदेशी उपस्थित होते.

‘पानी फाऊंडेशन’चे काम असेच सुरू राहिले, तर दोन वर्षांत राज्य जलयुक्त दिसेल. सरकारच्या वतीने स्पर्धकांना साडेसहा कोटींची बक्षीसे जाहीर केली आहेत, असेही फडणवीस म्हणाले.शाहरुख खान म्हणाला, पानी फाऊंडेशनने हा विचार कृतीतून सत्यात उतरविला आहे. यामध्ये खरे यश शेतकºयांचे असून त्यांच्या मेहनतीचेच हे फळ आहे. नीता अंबानी म्हणाल्या, आमिरने सुरू केलेली मोहीम आता लोकचळवळ झाली आहे.

पंचमहाभूते निसर्गाचे महत्त्वाचे घटक आहेत. पाणी आपले भेदभाव न करता संगोपन करीत असते.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना आमिर म्हणाला, एवढ्या गावांतून लोक आल्याचा आनंद आहे. हे सगळे काम तुमच्या मेहनतीचे फळ आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेंडकरांची प्लास्टिक मुक्तीसाठी अनोखी संकल्पना

News Desk

तरुणीचा विनयभंग करून केली धक्काबुक्की -रिक्षाचालक ताब्यात

News Desk

इंदिरा गांधीवरील ठरावावरून दोन्ही कॉँग्रेस आमने-समाने

News Desk