HW News Marathi
मुंबई

Dahi Handi | मुंबईत जखमी गोविंदांवर रुग्णालयात उपचार सुरु

मुंबई | आज राज्यभर दहीहंडीचे थरार पाहायला मिळत आहेत. जीवाची परवा न करता गोविंदा जिद्दीने उंच-उंच थर उभारत आहेत. मात्र आज मुंबईत काही गोविंदा जखमी झाले आहेत. यापैकी एका गोविंदावर जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ३ गोविंदांवर के इ एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एम टी अग्रवालमध्ये एकावर आणि वी एम देसाई रुग्णालयात एकावर उपचार सुरू आहेत. सहाही गोविंदांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. व्ही एम देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या १६ वर्षीय गोविंदाचे नाव आकाश माळी असे आहे.

रविराज गंगाराम चांदोरकर (वय 35) हे कालेलकर गोविंदा पथकाचे गोविंदा असून त्यांना प्लास्टर करून के.ई. एम. रुग्णालयातून सोडून देण्यात आले आहे तर जान्हवी जयवंत पतोडे (वय 14) हिला पायाला मार लागला असून के. ई. एम. रुग्णालयात तिच्यावर उपचार करून सोडून देण्यात आले. तसेच श्री गणेश गोविंदा पथकातील मनाली सुधीर मेने (वय 18), शंकर बाबुराव कागलाराम, अमेय हिराचंद पाटील (वय 25) हा वडाळ्यातील यश गोविंदा पथकातील गोविंदा आणि यज्ञ बाळकृष्ण मोरे यांच्यावर के. ई. एम. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचप्रमाणे काल खार दांडा सरावादरम्यान १४ वर्षीय चिराग पटेकर हा गोविंदा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खार येथील होली फॅमिली रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गोविंदा अपडेट (दुपारी 2 पर्यंत)

एकूण 36 जखमी त्यापैकी 18 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

  • जेजे 1
  • केईएम 2
  • नायर 2
  • अग्रवाल 2
  • राजावाडी 1
  • महात्मा फुले 1
  • व्ही एन देसाई 1
  • बांद्रा भाभा 3
  • एस के पाटील 2
  • पोद्दार 2

सर्वांची प्रकृती स्थिर

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभा अध्यक्षांवरील अविश्वास ठरावाला मुख्यमंत्र्यांचे विश्वास ठरावाने उत्तर

News Desk

मंत्र्यांच्या बंगल्या बाहेर काळे कंदील

News Desk

उंदीर मारण्याचा खर्च पाच लाख रुपये

News Desk