मुंबई | राष्ट्राभिमानी समितीच्या पुढाकाराने आणि बालगोपाळ मित्र मंडळ माउली गोविंदा पथकाच्या मदतीने दहीकाला उत्सवानिमित्त सोमवार दिनांक ३ सप्टेंबर २०१८ ला मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दहीहंडी साजरी करत आहे. गोविंदा पथक विविध ठिकाणी थर रचून मिळणाऱ्या मानधनातून जास्तीत जास्त रक्कम हि या देशासाठी व आपल्या सर्वांसाठी लढून हुतात्मा झालेल्या सैनिकांना मदत म्हणून देणार आहे.
तसेच जिथे गोविंदा थर लावेल तिथे वंदे मातरम व भारतमाता कि जय , छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्रवीर सावरकरांचा जयघोष करणार आहे. तसेच थरातून सावरकर व हुतात्मा कौस्तुभ राणे यांना मानवंदना देण्यात येणार आहे. समितीच्या वतीने शिवाजी पार्क परिसरात अनेक गोविंदा दुपारी भोजनाचा कार्यक्रम करतात मात्र त्यानंतर जेवलेल्या पत्रावळी किंवा अन्य उष्टी साधन सामुग्री अस्ताव्यस्त टाकून निघून जातात त्यामुळे प्रदुषण होते. त्याचा विचार करून समितीची एक फळी आज सायंकाळी ४ वाजता शिवाजीपार्क परिसरात स्वच्छता अभियान मोहीम राबवणार आहे.
समितीच्या वतीने आज दहीहंडी आयोजकांना स्वा. सावरकर यांची प्रतिमा असलेले सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.संपूर्ण कार्यक्रमाला स्वा.सावरकर राष्ट्रीय स्मारकाने सहकार्य केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.