मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना मुंबई पोलिसांनी १४ ऑगस्ट रोजी अटक केली होती. मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदाराला मारहाण केल्याप्रकरणी, नगरसेवक तुर्डे यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना जमीन करण्यात आला आहे. उद्या सायं. ४ वाजता आर्थर रोड कारागृहातून सुटका होणार आहे.
काय होते नेमके प्रकरण ?
कुर्ला येथे शौचालय बांधकामात होत असलेल्या दिरंगाईमुळे, नगरसेवक तुर्डे यांनी थेट कंत्राटदार स्वप्नील दाते आणि इंजिनियरला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. रात्रीच्या या घटनेनंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. यावरुन कुर्ला पोलिसांनी तुर्डेंना अटक केली आहे.
कोण आहेत संजय तुर्डे?
मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सहा नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिल्याने संजय तुर्डे हे एकमेव नगरसेवक सध्या मनसेसोबत आहेत. संजय तुर्डे यांच्यावर मुंबई महापालिका निवडणुकीनंतर विरोधी उमेदवाराकडून हल्ला झाला होता. पक्षासाठी हल्ला सहन करणारे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे मनसेसोबत आहेत.
संजय तुर्डे हे कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक 166 चे नगरसेवक आहेत. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर संजय तुर्डे आपल्या कार्यकर्त्यांसह घराबाहेर जल्लोष साजरा करत होते. परंतु याचवेळी संजय तुर्डे आणि 20 ते 25 कार्यकर्त्यांवर हल्ला झाला. ज्यात तुर्डे यांच्यासह पाच कार्यकर्ते गंभीर जखमी झाले होते. भाजपचे पराभूत उमेदवार सुधीर खातू यांनी हल्ला केल्याचा आरोप संजय तुर्डे यांनी केला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.