HW News Marathi
मुंबई

‘मरे’चा अजब कारभार, पूर्वसूचना न देता हार्बर मार्गावर अर्ध्या तासांचा ब्लॉक

मुंबई | मध्य रेल्वेच्या अजब कारभारामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. हार्बर रेल्वे मार्गावर कोणतीही सुचना न देता अर्ध्या तासाचा ब्लॉक घेण्यात आला. या ब्लॉकमुळे पनवेलहून सीएसटीकडे लोकल ट्रेन १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. परंतु मध्ये रेल्वेने कोणतीही पूर्वसूचना न देता ब्लॉक घेतल्याची माहिती समोर आली आहे.

हार्बरवर सकाळी ११ वाजल्यापासून लोकल गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. नेहमीप्रमाणे तांत्रिक बिघाड असण्याची शक्यता होती. मध्य रेल्वेच्या या सावळ्या गोंधळामुळे ऐन उष्णतेच्या काळात प्रवाशांना लोकलमध्येच ताटकळत थांबावे लागले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारळी पौर्णिमेनिमित्त वरळीच्या कोळीवाड्यात जल्लोष साजरा

News Desk

मध्य रेल्वेचा रविवार जम्बोब्लॉक

News Desk

अवघ्या चार मिनिटांत २२ जणांचा बळी

News Desk