HW News Marathi
मुंबई

दिवाळीच्या मुहूर्तावर म्हाडाने मुंबईकरांना दिली ही आनंदाची बातमी

मुंबई | दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मुंबईत आपल्या स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने आता एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. म्हाडाने १३८४ घरांची लॉटरी जाहीर केली आहे. येत्या १६ डिसेंबरला म्हाडाच्या लॉटरीचा निकाल लागणार आहे. म्हाडाच्या घरांसाठी पुढच्या आठवड्यात ५ नोव्हेंबरपासून लोकांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.

मुंबईकरांसाठी म्हाडाने अत्यल्प उत्पन्न गटासाठी घराची किंमत २० लाख व त्यापेक्षा जास्त तसेच अल्प उत्पन्न गटासाठी २० लाख ते ३५ लाख, तर मध्यम उत्पन्न गटासाठी ३५ लाख ते ६० लाख आणि उच्च उत्पन्न गटासाठी घराची किंमत ६० लाखांपेक्षा जास्त एवढी आहे.

म्हाडाने याआधी जाहीर केलेल्या १००० घरांसाठी मुंबईमध्ये त्यांच्याकडे जागाच उपलब्ध नव्हती. काही ठिकाणी म्हाडाच्या घराच्या किंमतींमुळे म्हाडावर मोठी टीका झाली होती. त्यामुळे आता नवनिर्वाचित अध्यक्ष उदय सामंत यांनी घरांच्या किंमती कमी करून मुंबईकरांसाठी दिवाळीच्या मुहूर्तावर घराची लॉटरी जाहीर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मतदान करा, लॉजिंगमध्ये डिस्काऊंट घ्या

News Desk

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Aprna

चर्चच्या महिला प्रसाधनगृहात सीसीटीव्ही कॅमेरे

News Desk