मुंबई | आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सकाळी कार्यालयात जाणा-या मुंबईकरांना हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे त्रासाचा सामना करावा लागला. कॉटन ग्रीन स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे सीएसएमटी आणि अंधेरी-पनवेलकडे जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.
Mumbai: Problem reported in OHE (Overhead Equipment) at Harbour line network between Wadala and Cotton Green stations; restoration work underway, the movement of Mumbai locals is not halted.
— ANI (@ANI) September 3, 2018
हार्बर रेल्वे मार्गावर बिघाड झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. कामासाठी घरातून बाहेर पडलेल्या प्रवाशांना लोकलमध्ये बिघाड आल्यामुळे कामावर पोहोचण्यास उशीर होणार आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.