HW News Marathi
मुंबई

तिच्या गुप्तांगात खुपसली लाठी म्हणून तिचा मृत्यू

मुंबई भायखळा तुरूंगातील महिला मृत्यू प्रकऱणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंजुळा मृत्यू प्रकऱणी 6 पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंजुळाच्या चांगल्या वर्तुवणूकेमुळे तिला वॉर्डन बनविण्यात आले होते. परंतू 23 जुन रोजी २३ जून रोजी सकाळी तिने दोन अंडी व पाच पाव कमी मिळाल्याची तक्रार तुरुंग प्रशासनाकडे केली. त्यानंतर तिला पोलिसांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर महिला पोलिसांनी तिच्या गुप्तांगात लाठी खुपसली होती व हेच तिच्या मृत्यूचे कारण ठरले.
केवळ या एका घटनेमुळे तिला प्राण गमवावे लागले. तिच्या मृत्यूनंतर अन्य महिला कैद्यांनी जेलच्या छतावर चढून आंदोलन केले होते. त्यासर्व महिला कैद्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या महिला कैद्यांमध्ये शिना बोरा प्रकरणातील आरोपी इंद्रायणी मुखर्जीचाही समावेश आहे. २३ जून रोजी मंजुळा यांनी तक्रार केल्यानंतर तुरुंग अधिक्षिका मनिषा पोखरकर यांनी आपल्या खोलीत बोलावून घेतले. प्रत्यक्षदर्शींनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना सांगितले की, जेव्हा मंजुळा या खोलीबाहेर आली तेव्हा ती वेदनेने विव्हळत होती. त्यानंतर तुरुंग सुरक्षादलाचे एक पथक महिला कैद्यांच्या बराकीत आले व त्यांनी पुन्हा मंजुळाला मारहाण करायला सुरूवात केली. त्यावेळी बराकीतील अन्य कैद्यांनी सांगितले की, मारहाण करणाऱ्यांमध्ये महिला कॉन्स्टेबल बिंदू नाईकडे, वसिमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंदे आदी सामील होत्या. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली.

प्रत्यक्षदर्शी माहितीच्या आधारे बिंदु आणि सुरेखा यांंनी मंजुळाचे पाय पकडले. आणि वसिमा शेख हातातील काठी तिच्या गुप्तांगात घातली. त्यानंतर मंजुळा रक्तबंबाळ अवस्थेत बराकीत पडलेली होती. यावेळी तुरूंग प्रशासन मात्र तिच्याकडे लक्ष दिले नाही. मंजुळा जेव्हा बाथरूमध्ये बेशुध्द आवस्थेत पडलेली होती तेव्हा निवासी डॉक्टराना बोलवण्यात आले. डॉक्टरांनी मंजुळाला तत्काळ जेजे रूग्णालय़ात उपचाराशाठी दाखल करण्यासाठी सांगितले. जेव्हा जेजे रूग्णालयता दाखले केलें. मात्र उपचाराआधीचे तिचा मृत्यू झाला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिच्या अंगावर 13 जखमा असल्याचे समोर आले. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार सहा पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

https://www.facebook.com/mahabatmi365/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

परळ बसस्थानकात एसटीचा ७० वा वर्धापनदिन साजरा

News Desk

मुंबईचे रस्ते तातडीने दुरुस्तीसाठी साडेपाच हजार कोटींचा निधी! – मुख्यमंत्री

Aprna

कुर्ल्याच्या भुयारी मार्गातून प्रवास करताय सावधान !

News Desk
मुंबई

यावर्षी व्हाईट हाऊसमध्ये झाली नाही ईद साजरी

News Desk

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या व्हाईटहाऊसमध्ये यावर्षी ईद साजरी करण्यात आली नाही. मात्र, व्हाईट हाऊसनं सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बिल क्लिंटन, जॉर्ज बूश आणि बराक ओबामा या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळात दरवर्षी व्हाईट हाऊसमध्ये ईदनिमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जात होतं. या परंपरेला यावर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी छेद दिलाय.

याआधी प्रत्येक राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळात व्हाइट हाऊसचे अधिकारी एक-दोन महिने आधीच इफ्तार पार्टीच्या आयोजनाची तयारी करत असायचे. पण यंदा त्यापैकी एकही गोष्ट व्हाईट हाऊसमध्ये बघायला मिळाली नाही. १८०५ साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांनी व्हाइट हाऊसमध्ये पहिल्यांदा रमजानच्या महिन्यात इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. मात्र, खऱ्या अर्थाने १९९६ पासून दरवर्षी ही इफ्तार पार्टी देण्याची परंपरा व्हाइट हाऊसने सुरू केली होती. राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि त्यांची पत्नी हिलरी क्लिंटन यांच्या काळात ही परंपरा सुरू झाली.

सेक्रेटरी ऑफ स्टेट रेक्स टिलरसन यांनी यावर्षी व्हाइट हाऊस इफ्तार पार्टीचं आयोजन होणार नाही, असं आधीच सांगितलं होतं. ‘ईद हा सण रमजानचा महिना संपल्यावर साजरा केला जातो. या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करतात तसंच प्रार्थना आणि दानधर्मसुद्धा करतात.

व्हाइट हाऊसकडून ईदबाबत एक निवेदन जारी करण्यात आलंय. ‘अमेरिकेत राहणाऱ्या मुस्लिमांनी जगातल्या अन्य भागात राहणाऱ्या मुस्लिमांप्रमाणे रमजानचा महिना आपल्या धर्माच्या शिकवणीनुसार पाळला तसंच शिकवणीनुसार दानधर्म केलं आणि रमजानचा महिना पाळला आहे. आता आपल्या कुटुंबियांसह ते ईद साजरी करतील. मुस्लिम बांधव आपले शेजारी आणि समाजातल्या इतर वर्गातल्या लोकांना अन्न वाटून घेण्याच्या आपल्या परंपरेचं पालनही करतील. यंदा ईदनिमित्त पुन्हा आम्ही दया, सहानुभूती आणि चांगल्या वागणुकीचं महत्त्व लक्षात ठेवू. अमेरिका या मूल्यांच्या सन्मानाशी वचनबद्ध आहे. ईद मुबारक’, असं व्हाइट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

Related posts

सरकार आहे की नकारघंटा?: विखे पाटील

swarit

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाची नववर्ष स्वागत यात्रा

News Desk

राष्ट्रसेवा दलाकडून सावित्रीबाईंच्या विचारांचा जागर

News Desk