HW News Marathi
मुंबई

मुंबईत हाय अलर्ट जारी, ऐन सणा-सुदीच्या वेळी नवे संकट

मुंबई | सणासुदीला सुरुवात झाली असून मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईवर ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. काही दिवसांत दिवाळीचा सण आहे. दिवाळी सण हा मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी मुंबईकर मोठया प्रमाणावर घराबाहेर पडतात. यावेळी वर्दळीच्या, गर्दीच्या ठिकाणांना दहशतवादी लक्ष्य करु शकतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून ड्रोनच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

मुंबईत छोटया ड्रोन उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. ३० ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर पर्यंत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या काळात मुंबईमध्ये सुरक्षा बंदोबस्त देखील वाढवला जाऊ शकतो. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कलम १८८ अतंर्गत कारवाई होऊ शकते.

सध्या संपूर्ण देशात अनलॉकचा फेज सुरु आहे. करोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. गर्दीमध्ये करोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांना मास्क घालण्यासह सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन वारंवार यंत्रणांकडून केले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वातंत्र्यदिनी मुंबईत ‘अल्ट्रा रन’

News Desk

प्रेयसीचा दोनदा गर्भपात करणाऱ्या प्रियकराला अटक

News Desk

मुंबईतील सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna