HW News Marathi
मुंबई

मेट्रो-३ च्या रात्रीच्या कामाला अखेर उच्च न्यायालयाची परवानगी

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाने दक्षिण मुंबईत मेट्रो ३ प्रकल्पाच्या रात्रं-दिवस चालणाऱ्या कामाला परवानगी दिली आहे. मेट्रोच्या रात्रीच्या कामावर घातलेल्या बंदीमुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकणार नाही अशी शक्यता निर्माण झाल्यामुळे मेट्रोकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. वर्षभरापूर्वी मेट्रो ३ च्या रात्री चालणाऱ्या कामाला बंदी घालणारा आदेश अखेर न्यायालयाने मागे घेतला आहे. परंतु ह्या कामासाठी दिलेल्या परवानगीसोबत काही अटीदेखील लागू करण्यात आल्या आहेत.

शहरात इतर कारणांमुळे होणारा आवाज हा सरासरी ८० डेसिबल इतका आहे. ‘नीरी’ने या संस्थेने केलेल्या तपासणीत म्हटल्याप्रमाणे शहरात इतर गोष्टींमुळे होणाऱ्या आवाजापेक्षा मेट्रोच्या कामाचा आवाज कमी आहे. तसेच मेट्रोच्या कामाचा प्रमाणापेक्षा अधिक आवाज होत असल्यास त्याविषयी तक्रार करण्यासाठी नागरिकांना एक आठवड्याच्या आत तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, असे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

तसेच रहिवाश्यांना जास्त त्रास होऊ नये म्हणून साउंड बॅरिअर्सचा वापर केला जाईल आणि खोदकामाची अवजड वाहने ही मुख्यत्त्वे दिवसभराच्या वेळेत वापरली जातील अशी हमीदेखील राज्य सरकारने दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे अभ्यासवाटीकेची दुरावस्था

News Desk

मुंबईच्या हवेत वाढते धुरक्याचे प्रमाण

News Desk

अमेझानच्या कर्मचाऱ्यांनी डिलिव्हरीसाठी पाठवलेल्या वस्तूची चोरी

swarit