HW News Marathi
मुंबई

मानखुर्दमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांनी केली पोलिसांना मारहाण

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन आहे. मात्र, लोकांच्या गरजेसाठी सर्व आत्यावश्यक सेवा या सुरु ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, या सगळ्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या पोलीसांवरच आता नागरिक हात उचलत आहेत. मानखुर्दमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना महिलांनी पोलासांवर हात उचलला आहे. तसेच, अश्लील भाषेत पोलीस कर्मचाऱ्यांना शिवागीळही केला आहे. या प्रकरणी तिघाना अटक झाली असून आणखी एकाचा शोध सूरु आहे.

घडलेल्या घटनेबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसा फेरीवाले हातगाडी घेऊन रस्त्यावर आल्याने मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन केले जाते होते. त्यामूळे पोलिसांना फोन करुन याची तक्रार देण्यात आली होती. अनेकांच्या हातगाड्या जप्त केल्या गेल्या. पण एका कुटुंबाने विरोध करत पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केईम रुग्णालयाचे छत कोसळून रुग्ण किरकोळ जखमी

News Desk

ताडदेव परिसरातील झोपडीला आग

News Desk

कोरोनाग्रस्तांच्या संख्येनुसार आरोग्य विभागाकडे पुरेशी संसाधने उपलब्ध

News Desk