मुंबई | मुंबईत रात्रीपासून मुसळधार पावसाचा जोर कायम ठेवला आहे. अंधेरी, दादर, कांदिवली, बोरिवली, मुलुंड, वरळी, चर्चगेट भागात जोरदार पाऊस पडत आहे. वसई-विरार आणि पालघर परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. आज दिवसभर मुंबईसह मराठवाडा आणि विदर्भामध्ये मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. कोकण व गोव्यावर मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे. याशिवाय, गुजरात आणि मध्य महाराष्ट्र मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो असा इशारा स्कायमेटने दिला आहे.
Spells of moderate #rain would occur at some places of #Mumbai, Mumbai Suburban, Palghar, #Raigad and #Thane during next 2-4 hours. #MumbaiRains
— SkymetWeather (@SkymetWeather) July 29, 2019
सूर्य प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणातून १३७४८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोल्हापूरातील कुंभी नदीवरील गोठे परखंदळे पुलावर तीन ते साडेतीन फूट पाणी आल्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.