HW News Marathi
मुंबई

श्वान पथकच्या मदतीने वडाळा रेल्वे स्थानकाची तपासणी, रेल्वे पोलिसांना सतर्कतेचा इशारा

मुंबई | पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रल हे रेल्वे स्थानक उडवण्याची धमकी देणार फोन आल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी सर्व स्थानकाची पाहणी केल्यानंतर ही अफवा असल्याचे कळले. मात्र या फोन नंतर सर्व रेल्वे स्थानके व परिसरात सतर्कतेचा इशारा लोहमार्ग पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी दिला आहे.

या अंतर्गत, वडाळा रोड स्थानकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित बारटक्के यांच्या नेतृत्वाखाली वडाळा रोड रेल्वे स्थानकाची श्वान पथकाच्या मदतीने तपासणी करण्यात आली. प्रत्येक स्थानकात कडक सुरक्षा ठेवण्यात आली असून सतर्कतेचा इशारा म्हणून काही उपाययोजनाचा अवलंब करण्यात आला. त्यानुसार आज वडाळा रोड रेल्वे स्थानकाची संपुर्ण तपासणी करण्यात आली.

यासाठी घाटकोपर येथील श्वानपथक म्हणजे डॉग शेरा ( नार्कोटिक्स ) मदतीने पाहणी केली गेली. हँडलर पोलीस हवालदार सतीश गावकर, डॉग शौर्या ( स्निफ़र ) हँडलर पोलीस शिपाई बापू मराठे व तांत्रिक सहाय्यक पोलीस उप निरीक्षक प्रकाश पाटील यांनी एकत्रितपणे वडाळा रोड स्थानकावरील फलाटे, अडगळीच्या जागा, कचराकुंड्या, स्टॉलच्या आजुबाजुचा संपुर्ण परिसर, उपहार गृह व स्थानक परिसरात तपासणी केली. सहाय्यक पोलीस उप निरीक्षक- शशिकांत घोलप, पोलीस हवालदार मंगेश साळवी, पोलीस हवालदार मंजुळा सोळंकी, पोलीस शिपाई संतोष गव्हाणे, भारत सुरवसे, दिनेश जगताप, सुहास जाधव व पोलीस शिपाई ललिता पवार यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात लठ्ठपणाविरोधात मोहीम चालवणार, मुख्यमंत्र्यांची घोषण

News Desk

छोट्या पडद्यावर प्रसिद्ध बालकराकाराचा रेल्वे मृतदेह सापडल्याने खळबळ

swarit

घाटकोपर साई दर्शन इमारतीतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांकडून प्रत्येकी दोन लाख

News Desk