HW News Marathi
Covid-19

कोरोनाचे IPLवर सावट, BCCI ची आयपीएलचे उर्वरित सामने रद्द करण्याची घोषणा

नवी दिल्ली | देशभर कोरोनाचा उद्रेक होत असताना आता IPLलाही कोरोनाने घेरलं आहे. सध्या सुरु असलेली आयपीएल २०२१ ची स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

देशभर कोरोनाचा उद्रेक होत असूनही आयपीएलच्या स्पर्धा सुरुच होत्या. नियम पाळले जात असतानाही खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे कालचा RCB विरुद्ध KKR हा सामना रद्द झाला होता. त्यानंतर आज दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि सनरायजर्स हैदराबादचा रिद्धिमान साहा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे IPL ची स्पर्धा आता रद्द करण्याचा निर्णय BCCI ने घेतला आहे.

 

आयपीएलमध्ये कोरोनाचा झाला उद्रेक

काल (३ मे) एकाच दिवसात आयपीएलशी संबंधित १० जण आणि एक स्टेडियम कोरोनाच्या विळख्यात सापडलं होतं. कोरोनाने आधी केकेआर मग नंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या (ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश केला होता. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एका बस क्लीनरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. २ मे ला त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

सीएसकेच्या संघातील इतर खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफमधील पाच कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. काल एकाच दिवसात आयपीएलशी संबंधित १० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आयोजकांच्या चिंता वाढल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासांत ८३,८०९ नवे रुग्ण आढळले

News Desk

पायी प्रवास करत मंजूर घराकडे निघाले अन् कोरोना महामारीचे चित्र बनले !

News Desk

मुंबई महानगर क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी रुग्णालयातून घेतला आढावा

Aprna