मुंबई | संघ आणि भाजपविरोधातील विचारधारेची लढाई आहे. ही लढाई आता पूर्वीपेक्षा दहा पट अधिक तीव्रतेने लढणार आहोत, असा निर्धार राहुल गांधी आज व्यक्त केला. गौरी लंकेश हत्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांप्रकरणी दाखल मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी आज (४ जुलै) राहुल गांधी मुंबईतील शिवडी न्यायालयात उपस्थित राहिले होते. या प्रकरणी न्यायालयाने १५ हजाराच्या जातमुचलक्यावर राहुल यांना जामीन मंजुर केला आहे. तेव्हा त्यांनी संघ आणि भाजपच्या विराचरधारेवर जोरदार टीका करताना या विचारसणीविरोधातील लढाई सुरू ठेवण्याचा सांगितले.
#WATCH Rahul Gandhi after appearing in a Mumbai court in a defamation case: I didn't say anything in court,I had to appear. It's a fight of ideology,I'm standing with the poor & farmers.'Aakraman ho raha hai, mazaa aa raha hai'. I'll fight 10 times harder than I did in last 5 yrs pic.twitter.com/AoeQJfdTBU
— ANI (@ANI) July 4, 2019
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांमुळे दाखल मानहानीच्या खटल्यात जामीन मंजूर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी विचारधारेची लढाई तीव्रतेने लढणार असल्याचे सांगितले. ”ही विचारधारेची लढाई आहे, ही लढाई आम्ही गेल्या पाच वर्षांत जेवढ्या तीव्रतेने लढत होतो त्यापेक्षा दहापट अधिक शक्तीने लढणार आहोत. मी गरीब, शेतकरी, मजूर यांच्यासोबत आहे,” राहुल गांधींनी न्यायालयातून बाहेर आल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. राहुल यांनी मुंबईत दाखल झाल्यानंतर विमानतळाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.