HW News Marathi
Covid-19

मुंबईत केईएम रुग्णालयात कोव्हिडशील्डचे मानवी परीक्षण सुरु

मुंबई | जगात थैमान घालत असलेल्या कोरोनावर लस कधी येणार या प्रतीक्षेत सगळेच जण आहेत. जगभरात अनेक ठिकाणी लसीची चाचणी सुरू आहे. अशात मुंबईतकोव्हिडशील्डचे मानवी परीक्षण सुरु झाले आहे. आज (२६ सप्टेंबर) तीन लोकांवर लसीचे परीक्षण केले जाणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता हेमंत देशमुख यांनी दिली आहे.

“आम्ही आतापर्यंत 13 लोकांवर स्क्रीनिंग केली आहे. यामध्ये १० लोकांची स्क्रीनिंग पूर्ण झाली आहे”, असं रुग्णालयाच्या डीन देशमुख यांनी सांगितले. मानवी परीक्षण प्रक्रियेमध्ये एका इतर व्यक्तीला प्लेसीबो मिळणार. केईएम हे पहिले रुग्णालय आहे. जिथे सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाद्वारे निर्मित मानवी परीक्षण केले जाणार आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीद्वारे कोव्हिडशील्ड लस विकसित केली आहे आणि भारतातील पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट तयार करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूरचे ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाची लागण

swarit

…मग पंतप्रधानही अयोध्येचा कार्यक्रम दिल्लीतून प्रतिकात्मक का करत नाहीत ?

News Desk

मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पालिकेच्या नव्या गाईडलाईन्स जारी

News Desk