मुंबई | सरकारमधील नेत्यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहेच. परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याचे कारण, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेत परब यांच्याबाबत एक तक्रार केली आहे.
ही तक्रार परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टबाबत आहे. हा रिसॉर्ट परब यांनी काळ्या पैशातून बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. फक्त जावडेकरच नाही तर सोमय्या यांनी याबाबत ED, CBI, आयकर विभाग आणि महसूल मंत्रालयाकडेही तक्रार केली. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ED ने अनिल देशमुख व त्यांचे सचिव कुंदन आणि पालांडे यांच्या विरोधात वाझे वसुली प्रकरणात गुन्हा, FIR / ECIR नोंदवला आहे. अनिल देशमुख व ग्रुप द्वारा ₹100 कोटींची हेरफेर, भ्ष्टाचाराचा पैसा, मनी लाँडरींग….
पुढचा नंबर अनिल परब चा लागणार @BJP4Maharashtra pic.twitter.com/0XxF40QHpq
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 11, 2021
“पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे मी भेट घेतली. मंत्री अनिल परब यांनी लॉक डाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे ₹१० कोटीचा ( काळा पैसा) बेकायदेशीर साई रिसॉर्ट बांधला. त्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून पर्यावरण मंत्रालयाची विशेष टीम जाणार. ED, CBI, आयकर विभाग, महसूल मंत्रालय कडे ही मी तक्रार केली आहे’, असं ट्वीट करत सोमय्या यांनी याबाबत माहिती दिली आहे.
#ED registered #ECIR against #AnilDeshmukh and his secretaries #Kundan & #Palande in #VazeVasooli Case. It's ₹100 crore money laundering, parking scam money by Deshmukh & Group. #AnilParab is next in line @BJP4India@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/2VMSnLkYbg
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 11, 2021
काय म्हणाले अनिल परब?
किरीय सोमय्या यांच्या या आरोपांवर अनिल परब यांनीही उत्तर दिलंय. पत्रकारांनी सोमय्यांच्या आरोपांबाबत विचारलं असता,सोमय्यांच्या आरोपांना आम्ही त्या त्या प्लॅटफॉर्मवर उत्तर देऊ, असं अनिल परब म्हणाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.