मुंबई | व्हॉट्सअॅप मेसेंजरचे आता नवे फिचर आले आहे. सध्या व्हॉट्सअॅपमध्ये व्हॉइस मेसेजचे असे फिचर आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचा आवाज रेकॉर्ड करून पाठवू शकता. आतापर्यंत व्हॉट्सअॅपमध्ये व्हॉइस मेसेजची जी सुविधा होती त्यात तुम्हाला जे जे व्हॉइस मेसेज ऐकायचे असतील तर त्यावर स्वतंत्रपणे क्लीक करावे लागत होते. मात्र, आता व्हॉट्सअॅपच्या या नव्या फिचरमध्ये असे होणार नाही.
असे आहे व्हॉट्सअॅपचे नवे फिचर
WABetainfo यांच्या रिपोर्टनंतर, गूगल प्ले बीटा प्रोग्रामने नवे अपडेट आणले आहे. या नव्या अपडेटद्वारे तुमचा एक व्हॉइस मेसेज ऐकून संपल्यानंतर दुसरा व्हॉइस मेसेज त्या मागोमाग स्वतःहून सुरु होणार आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने पाच व्हॉइस मेसेज पाठविले तर त्यातला एक व्हॉइस मेसेज संपल्यानंतर लगेचच दुसरा व्हॉइस मेसेज तुम्हाला ऐकता येईल. व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरला Consecutive Voice Message असे नाव देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या नव्या अपडेटमध्ये एक व्हॉइस मेसेज संपल्यानंतर दुसरा व्हॉइस मेसेज सुरु होण्यापूर्वी तुम्हाला एक विशिष्ट टोन ऐकू येईल. जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल कि, पहिला व्हॉइस मेसेज संपला असून त्याच्या पुढचा व्हॉइस मेसेज सुरु झालेला आहे. त्याचप्रमाणे जर एखाद्या व्हॉइस मेसेजच्या पुढे इतर कोणताही व्हॉइस मेसेज नसेल तर तुम्हाला आणखी एक वेगळी टोन ऐकू येईल.
दरम्यान, व्हॉट्सअॅपचे हे नवे फिचर अद्याप स्टेबल व्हर्जनमध्ये सर्वांसाठी जारी करण्यात आलेले नाही. पुढच्या अपडेटच्या वेळी हे नवे फिचर सर्वांना वापरासाठी उपलब्ध होणार आहे. या नव्या फिचरद्वारे व्हॉइस मेसेजचा वापर करणे अधिक सोपे होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.