HW News Marathi
मुंबई

कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू

धनंजय दळवी | कुर्ला येथील पालिकेच्या नव्याने बांधकाम केलेल्या भाभा रुग्णालयात अतिदक्षता विभाग नव्याने सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता गरजेच्या वेळी रुग्णांना मुंबईत इतरत्र नेण्यासाठी धावाधाव करावी लागणार नाही.

दुरुस्तीच्या कारणास्तव हे रुग्णालय मागील चार वर्षांपासून बंद होते. केवळ ओपीडी सुरू ठेवण्यात आल्याने आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी रुग्णांना प्राथमिक वैद्यकीयमदत देऊन इतर इतर रुग्णालयात नेण्यात येत होते. आता रुग्णालयाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यामुळे अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने इतर विभाग सुरू करण्यात येणार असल्याचे भाभा रुग्णालयाचे डीन डॉ पिंपळे यांनी सांगितले.

स्थानिक लोकांचा प्रश्न सुटला –

मागील चार वर्षांपासून दुरुस्तीच्या कारणास्तव भाभा रुग्णालय बंद होते. सामान्य आणि स्थानिक जनतेला उपचारासाठी सायन किंवा केईएम रुग्णालयात धावपळ करावी लागायची. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळावी याकरिता आम्ही सातत्याने प्रयत्न आणि पाठपुरावा करत होतो. शेवटी आम्हाला यश मिळाले. असे स्थानिक नगरसेविका डॉ. सईदा ख़ान, यांनी सांगितलं.

मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला भाभा रुग्णालयामध्ये अतिदक्षता(ICU) उभारण्यात आले. या अतिदक्षता विभागाचे लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते व उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश नवाब मलिक, वॉर्ड क्र.१६८ च्या नगरसेविका डॉ. सईदा ख़ान, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक कप्तान मलिक, समाजसेविका डॉ ज्योत्सना जाधव, इक्बाल मलिक आणि स्थानिक रहिवाशी, अनेक मान्यवर उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नगरसेविका पत्नीच्या डोक्यात नारळ मारून प्रचाराला सुरूवात  

News Desk

मराठा आरक्षण अहवाल १५ नोव्हेंबरला सादर होणार, पुढील सुनावणी १० सप्टेंबरला

News Desk

‘त्या’ला कुर्ला स्थानकात सापळा रचून पकडले

News Desk