HW News Marathi
मुंबई

ग्रामीण भागातील जीवनावर आधारित चित्र प्रदर्शन

मुंबई | ग्रामीण भागातील जीवन शैलीवर आधारित चित्र प्रदर्शन वरळीच्या नेहरू सेंटर मध्ये भरविण्यात आले आहे. 24 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या चित्र प्रदर्शनात विविध प्रकारचे ग्रामीण जीवनातील प्रसंग रेखाटण्यात आले आहेत. या चित्रांचे सर्व विषय वास्तववादी असून व्यक्तींच्या चेहऱ्यांवरील अविर्भाव अत्यंत जिवंत आहेत.

 

 

सर्व चित्रे कॅनव्हास वर असून तैल रंगातील आहेत. मानवी शरीराचे अचूक व प्रमाणबद्ध रेखाटन असून चित्रातील बारकावे चित्रकाराणे अतिशय कुशलतेने हाताळले आहेत. तसेच निसर्गाचे प्रतिबिंब मानवाच्या जीवनावर कसे परिणाम करू शकते. या विषयांवरील ही बोलकी आहेत.

शहरात रहाणाऱ्या ग्रामीण जीवनशैली पासून वंचित असलेल्या मुंबईकरांसाठी हे प्रदर्शन परवणी ठरत आहे. काळाच्या ओघात लुप्त होत असलेली घोडा गाडी , पोतराज, वासुदेव हे या प्रदर्शनाची शोभा वाढवत आहेत.

चित्रात दाखवलेली धनगर महिला तिच्या चेहऱ्यावर असलेले भाव पोटच्या मुलाप्रमाणे तिने सोबत घेतलेला घोडा यातील बारकावे चित्रकार रमेश दारकुंडे यांनी हुबेहूब रेखाटले आहेत. प्रदर्शनात क्रमांक एक ला असलेले हे चित्र पहाणाऱ्या चे लक्ष वेधून घेते.

मोटार गाड्यांमुळे ग्रामीण भागातही लुप्त झालेली बैल गाडी काळी भोर म्हैस, रणरणत्या उन्हाळ्यात करपलेले गवत तरीही छान फुललेला गुलमोहर आणि त्या गुलमोहर चे नैसर्गिक सौंदर्य चित्रकार संदेश नखाते यांच्या चित्रातून पहायला मिळते.

शाळांना सुट्ट्या असल्यामुळे खास नेहरू सेंटर मध्ये येऊन या चित्रप्रदर्शनाला बच्चे कंपनी भेट देताना पहायला मिळत आहे. बच्चे कंपनीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चित्रप्रदर्शन विनामूल्य असून सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत खुले रहाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई मेट्रोची वाहतूक विस्कळीत

News Desk

डबेवाल्यांमध्ये प्रसिद्धीसाठी चढाओढ

News Desk

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

News Desk