HW News Marathi
मुंबई

महालक्ष्मी रेसकोर्स येथे भरधाव मर्सिडीजने एका पादचाऱ्याला चिरडले

मुंबई | महालक्ष्मी रेसकोर्स येथे भरधाव मर्सिडीजने एका पादचाऱ्याला चिरडले आहे. यात पादचाऱ्याचा मृत्यू झाला असून एक वाहनचालक जखमी झाला आहे.हा अपघात काल (३ जून) रात्री घडली असून या भीषण अपघातात गाडीच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला.

या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव राजेंद्र कुमार असून तो सुतार काम करून अपला उदरनिर्वाह करत होता. हिरा व्यापारी ललित अदानी यांचा मुलगा चैतन्य कार चालवत होता. हाजीअली रोडवरील सिग्नल सुटला त्यावेळी वोल्वो कार आणि मर्सिडीज कार एकमेकांना ओव्हवरटेक करत महालक्ष्मी स्टेशनच्या दिशेने जात होत्या. गाडीचा ताबा सुटल्याने चैतन्यने हा अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे

अचानक मर्सिडीज कारचा चालक चैतन्य अदानी याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि त्याच्या गाडीने राजेंद्रला चिरडलं. गाडी चैतन्यची गाडी महालक्ष्मी रेसकोर्सची संरक्षण भिंत तोडत रेसकोर्सच्या आवारात शिरली. याप्रकरण ताडदेव पोलिसांनी आरोपी चैतन्यला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. चैतन्याला आज (४ जून) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभाविपच्या संघर्षाला यश, उत्तरपत्रिका घोटाळा प्रकरणात चौकशी समितीची घोषणा

News Desk

विसर्जनानंतर स्वच्छतेसाठी दादर चौपाटीवर पर्यावरण प्रेमी एकटले

swarit

मुंबईत कांद्याचे दर घसरले, कांद्याची आवक वाढली

News Desk