HW News Marathi
मुंबई

एखादे काढलेले झाकण महापौरांच्या तोंडावर ठेवूया | आव्हाड

मुंबई | “स्थानिक लोक गटारांमध्ये कचरा टाकण्यासाठी अनेकदा गटारे तोडतात. महापालिकाकडून नेहमी असे न करण्याची विनंती करण्यात येत असूनही काही लोक याची पुनरावृत्ती करत असतात. मुंबईकरांना ‘सिव्हिक सेन्स’ नाही”, असे विधान मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे. गोरेगावमधील एक अडीच वर्षांचा चिमुकला नाल्यात पडून वाहून गेल्याच्या घटनेनंतर तब्बल १० तासांनी महाडेश्वर यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर हे वक्तव्य केले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडेश्वर यांच्यावर निशाणा साधला आहे.

“मुंबईकरांनो, चला जाऊया आणि एखाद काढलेले झाकण महापौरांच्या तोंडावर ठेवूया. म्हणजे असंबद्ध बोलण तरी बंद होईल”, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. गोरेगावमध्ये अडीच वर्षांचा चिमुकला उघड्या नाल्यात वाहून गेल्याच्या घटनेनंतर महाडेश्वर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी एकीकडे महापौरांनी आपण या प्रकरणाची कसून चौकशी करणार असून या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करू असे आश्वासन दिले. मात्र, दुसरीकडे महाडेश्वर यांनी या संपूर्ण प्रकरणी मुंबईकरांच्या सिव्हिक सेन्सला जबाबदार ठरवत याचे खापर सर्वसामान्य मुंबईकरांवर फोडले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

के.ई.एम रुग्णालयात योग दिन साजरा

News Desk

मुंब्रा बायपास रोडवर दोन कंटेनर आदळून अपघात

News Desk

दादर सांस्कृतिक मंचातर्फे मोदकोत्सव २०१८चे आयोजन

swarit