HW News Marathi
मुंबई

शनिवारी रात्री पासून मेगा ब्लॉक

मुंबई | कुर्ला ते सायन या मध्य रेल्वेवरील स्थानकांमध्ये असलेला पादचारी पूल तोडण्यात येणार आहे त्यामुळे शनिवारी रात्री विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत हार्बर, मध्य रेल्वेवरील लोकल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. या पादचारी पुलाच्या कामामुळे सामान्य प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

त्याचबरोबर शनिवार रात्री हार्बरच्या दोन्ही मार्गांवर आणि मध्य रेल्वेच्या अप जलद मार्गावर रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ५.३० पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या डाऊन जलद आणि अप-डाऊन धीम्या मार्गावर रात्री १.३० ते पहाटे ३.३० पर्यंत ब्लॉक सुरु रहाणार आहे.

  • रविवारीयाएक्स्प्रेस गाड्या होणार रद्द
  1. पुणे-सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस
  2. मनमाड-सीएसएमटी- मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस
  3. पुणे-सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस
  4. मनमाड-सीएसएमटी-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस
  5. मनमाड-एलटीटी-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सिद्धूविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक

swarit

राज्य शासनाच्या बारा अधिकाऱ्यांना ‘आयएएस’पदी पदोन्नती

News Desk

मुंब्रा बायपास रोडवर दोन कंटेनर आदळून अपघात

News Desk
मुंबई

इंजिनीअर्ससाठी भावीकाळात करिअरच्या नव्या संधी

News Desk

मुंबई | नेस डिजिटल इंजिनीअरिंग व एसअँडपी ग्लोबल ने हैदराबादमध्ये सुरू केले नावीन्यासाठी जागतिक दर्जाचे खुले केंद्र – नेस डिजिटल इंजिनीअरिंग या डिजिटल परिवर्तन व कस्टम सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग सर्व्हिसेस देणाऱ्या कंपनीने तंत्रज्ञान, डेटा ऑपरेशन्स व कोअर बिझनेस प्रोसेस यातील गुणवत्तेसाठीच्या सेंटर ऑफ एक्सलन्सला पाठिंबा देण्यासाठी एसअँडपी ग्लोबलबरोबर भागीदारी करून हैदराबाद येथे ओरिअन केंद्र सुरू केले आहे.

एसअँडपी ग्लोबलचीची उत्पादने व सुविधा विकसित करण्यासाठी, नव्या १,००,००० चौरस फूट केंद्रामुळे सर्वोत्तम गुणवत्तेला काम करण्याच्या दृष्टीने जागतिक दर्जाचे वातावरण निर्माण केले आहे. एसअँडपी ग्लोबल ही जगभरातील भांडवल व कमोडिटी मार्केटना पारदर्शक व स्वतंत्र रेटिंग्स, बेंचमार्क, विश्लेषण व डेटा देणारी आघाडीची कंपनी आहे.

८५० हून अधिक असोसिएट्सना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने आखलेले ओरिअन केंद्र कर्मचाऱ्यांना नवे तंत्रज्ञान व जागतिक कम्युनिकेशन्सच्या पायाभूत सुविधा, तसेच एकमेकाशी सहयोग साधण्यासाठी टीमना जागा उपलब्ध करून नावीन्याला चालना देण्याच्या हेतूने उभारले आहे. आर्टिफिशिअल इंटलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, मशीन लर्निंग व डेव्हऑप्स नावीन्य व सुविधा यावर भर देणारी अद्ययावत तंत्रज्ञानाची प्रयोगशाळा या केंद्रामध्ये आहे.

“उत्कृष्ट अशी टीम घडवण्यासाठी आम्हाला मदत व्हावी म्हणून आपले सखोल प्रादेशिक ज्ञान व सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग कौशल्य यांचा वापर करणाऱ्या नेसबरोबर केलेल्या यशस्वी भागीदारीमुळे ओरिअन केंद्र सुरू करणे शक्य झाले,” असे एसअँडपी ग्लोबलचे टीफ टेक्नालॉजी ऑफिसर निक कॅफरिलो यांनी सांगितले. “नवे दृष्टिकोन अवलंबणे, आमच्या कार्यपद्धतीची गती वाढवणे, ग्राहकांना अधिकाधिक मूल्य देणे व भविष्यातील बाजारांना चालना देणारी सर्वात नावीन्यपूर्ण कंपनी म्हणून आमचा ब्रँड नावारूपास आणणे, या क्षमता आमच्या मनुष्यबळामध्ये निर्माण करण्याची आमची बांधिलकी ओरिअन अधोरेखित करते.” एसअँडपी ग्लोबलमध्ये सध्या ३५० कर्मचारी कार्यरत आहेत आणि या वर्षा अखेरीपर्यंत ही संख्या ६०० कर्मचाऱ्यांपर्यत वाढेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्ती केली आहे.

Related posts

आज अमित शहा घेणार उद्धव ठाकरेंची भेट

News Desk

फोर्टमधील पटेल चेंबर्स इमारतीला भीषण आग

News Desk

घाटकोपरमध्ये चार्टड विमान कोसळले

News Desk