HW News Marathi
मुंबई

मध्य रेल्वेच्या मुलंड ते माटुंगा या स्थानकांदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक

मुंबई | मुंबईमध्य रेल्वेच्या मुलंड ते माटुंगा या स्थानकांदरम्यान सीएसएमटीच्या दिशेने धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रुझ ते माहिम या स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी १० वाजून ३५ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत जम्बो ब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वेवर रविवारी सकाळी १० वाजून ३७ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ३१ मिनिटांपर्यंत ठाणे स्थानकातूून, सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. सकाळी ११ वाजून ४ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ६ मिनिटांपर्यंत कल्याण स्थानकातून सीएसएमटीकडे जाणारी जलद लोकल दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकांवर थांबेल.

सकाळी १० वाजून १६ मिनिटे ते दुपारी २ वाजून ५४ मिनिटांपर्यंत सीएसएमटी पासून कल्याणच्या दिशेने जाणारी जलद मार्गावरील लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबविण्यात येतील. त्यामुळे लोकल स्थानकावर पोहोचण्यास २० मिनिटांचा विलंब लागेल. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या सर्व लोकल पोहोचण्यास १० मिनिटांचा विलंब लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईचे पाहुणे, फ्लेमिंगो पक्ष्यांची शिकार

News Desk

बिना ड्रायव्हरची मेट्रो लवकरच मुंबईकरांच्या भेटीला…

News Desk

मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

News Desk