HW News Marathi
मुंबई

उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई | रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज (१६फेब्रुवारी) मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही मार्गावर रेल्वेचे काम करण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी ११.३० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत असणार आहे.

पश्चिम रेल्वे-

  • सांताक्रूझ ते माहीम या अप व डाऊन जलद मार्गावर
  • स. १०.३५ ते दु. ३.३५ वाजेपर्यंत
  • ब्लॉकदरम्यान अप-डाऊन जलद मार्गवरील लोकल अप-डाऊन धिम्या मार्गवर वळविण्यात येणार आहेत. या दरम्यान काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वे –

  • मुलुंड ते माटुंगा सीएसएमटी दिशेने अप धिम्या मार्गावर
  • स. ११.३० ते दु. ४ वाजेपर्यंत
  • मुलुंड ते माटुंगा ब्लॉकदरम्यान सर्व धिम्या लोकल अप जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे मेल, एक्स्प्रेस, लोकल सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे –

  • पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर
  • स. ११.३० ते दु. ४ पर्यंत ब्लॉक
  • पनवेल ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते पनवेल या दोन्ही मार्गावरील लोकलसेवा बंद राहतील. तसेच पनवेल ते अंधेरी आणि ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते पनवेल या मार्गावरील लोकल सेवा बंद ठेवण्यात येतील. या दरम्यान सीएसएमटी ते वाशी आणि ट्रान्स हार्बरवरून ठाणे ते नेरुळ या मार्गावरून विशेष गाडय़ा सोडण्यात येतील.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे शरद पवारांच्या चरणी

News Desk

पनवेलमध्ये वैदू नगर झोपडपट्टीला आग

News Desk

वृत्तनिविदेकच्या अंगावर नारळाचे झाड कोसळले.CCTV

News Desk