HW News Marathi
मुंबई

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई । मध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्गावर पायाभूत सुविधाचे काम करण्यासाठी आज (२१ एप्रिल) यांनी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड डाऊन धिम्या मार्ग वळविण्यात आली आहे. माटुंगा ते मुलुंड डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन दिशेने जाणाऱ्या धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. धिम्या मार्गावर विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकात लोकल थांबणार नाहीत.

पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दोन्ही जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या काळात हार्बरवरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून मध्य रेल्वे मुख्य मार्ग व पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या उशिराने धावतील. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रलदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दरम्यान लोकल धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.

हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रेपर्यंतच्या दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगाव दरम्यानच्या दोन्ही मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला ते पनवेलदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेस्मा कायद्यावरून शिवसेना पुन्हा आक्रमक पाचव्यांदा सभागृह तहकूब

News Desk

ड्रोणद्वारे दुष्काळाची पाहणी

News Desk

अशी असेल माल्ल्याची आर्थर रोड कारागृहात व्यवस्था

News Desk