मुंबई । मुंबईच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज (१०मार्च) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे आज मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण-दिवा मुख्य मार्गाच्या स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर, हार्बर रेल्वेवर सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गावर तर, पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-मुंबई स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गांवर हा मेगाब्लॉक असणार आहे.
दिनांक १०.३.२०१९ रोजी मेगा ब्लॉक.
कल्याण – दिवा अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ वा. पासून दुपारी ३.४५ वा. पर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० वा. पासून दुपारी ४.१० वा. पर्यंत. pic.twitter.com/VJMiSbGLmK
— Central Railway (@Central_Railway) March 9, 2019
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवर कल्याण-दिवा स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर आज सकाळी ११.१५ वाजल्यापासून दुपारी ०३.४५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे ब्लॉकच्या काळात या मार्गावरील लोकलसेवा अप स्लो मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत.
मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या अप मार्गावरील वाहतूक उशिराने धावेल. तसेच काही लोकल रद्द देखील करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्याही २० ते ३० मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वेमार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावर सकाळी ११.४० वाजल्यापासून दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. तर चुनाभट्टी/वांद्रे ते सीएसएमटी अप मार्गावर सकाळी ११.१० वाजल्यापासून दुपारी ३.४०वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. मेगाब्लॉकच्या दरम्यान या स्थानकांदरम्यान हार्बर रेल्वेची लोकलसेवा पूर्णपणे बंद असणार आहे.सीएसएमटीसाठी पनवेल, वाशी आणि बेलापूरहून सुटणाऱ्या लोकल सकाळी ९.५३ वाजल्यापासून दुपारी २.४४ वाजेपर्यंत बंद असतील. तर सीएसएमटीहून वांद्रे आणि गोरेगावसाठी निघणाऱ्या लोकल सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ या वेळेत बंद असतील.
हार्बरवरील प्रवाशांना मेगाब्लॉकच्या काळात मध्य आणि पश्चिम रेल्वेवरुन प्रवासाची मुभा रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
A jumbo block of five hours will be taken from 10.35 hrs to 15.35 hrs on Sunday, 10th March, 2019 on UP and DOWN Slow lines between Churchgate and Mumbai Central stations for the maintenance of track, signaling and overhead equipment. #WRUpdates pic.twitter.com/NLpwg0AGCJ
— Western Railway (@WesternRly) March 9, 2019
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावर आज जंबोब्लॉक घेण्यात येईल. सकाळी १०.३५ वाजल्यापासून ते दुपारी १५.३५ वाजेपर्यंत हा जंबोब्लॉक असेल. या काळात चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यानची अप आणि डाऊन स्लो मार्गावरील लोकलसेवा फास्ट मार्गावरुन वळवण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने धावेल. तसंच काही लोकलही रद्द करण्यात आल्या आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.