HW News Marathi
मुंबई

रेल्वेच्या तीनही मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मुंबई । रेल्वे मार्गावरील सिग्नल, तांत्रिक कामांसाठी तीनही रेल्वेच्या मार्गावर रविवार २२ जुलै रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा या अप जलद मार्गावर सकाळी १०.१५ वा.पासून दुपारी ३.१५ वा. पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी ९.३८ पासून दुपारी २.५४ वा. पर्यंत सीएसएमटीहून सुटणार्‍या डाऊन जलद, सेमी जलेद मार्गावरील लोकल माटुंगा, मुलुंड दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत.

या लोकल सायन आणि मुलुंड स्थानकांदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. तर हार्बर मार्गावर सकाळी ११.४० वाजल्यापासून दुपारी ४.४० वा. पर्यंत सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे या डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. चुनाभट्टी-वांद्रे, सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० वा. पासून सायंकाळी ४.१० वा. पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर सकाळी ११ ते संध्याकाळी५ या काळात बोरीवली-नायगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.

तसेच दिवा स्थानकात आज विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. दिवा स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर उभारण्यासाठी आज (शनिवारी) रात्री १०.३० ते उद्या सकाळी ४.१५ वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक

swarit

ठाण्यातील कोपरीमध्ये डेकोरेशनच्या गोदामाला भीषण आग

News Desk

नवी मुंबईत गगनचुंबी इमारतीला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही

swarit