HW Marathi
मुंबई

आज पश्चिम-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई | पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी (१० फेब्रुवारी) सांताक्रृझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. या मार्गावरील अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ यावेळेत जम्बो ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक असतांना सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. तर लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

मध्य हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. या मार्गावरील अप आणि डाउन सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक असणार आहे. तर सीएसएमटी ते कल्याण या मार्गावर कुठलाही ब्लॉक असणार नाही.

सीएसएमटी आणि वडाळा रोड ते वाशी, बेलापूर, पनवेल दिशेकडे जाणाऱ्या सर्व लोकल फेऱ्या सकाळी ११ वाजून ३४ मिनिटांपासून ते सायंकाळी ४ वाजून २३ मिनिटांपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. याचप्रमाणे वडाळा, वाशी, बेलापूर, पनवेल ते सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांपासून ते सायंकाळी ४ वाजून १६ मिनिटांपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

Related posts

खंबाटा एव्हिएशनच्या कर्मचार्‍यांचे अनिश्चित कालीन उपोषण

Gauri Tilekar

महापौरांचा मुख्यमंत्र्यांवर पावसाळी घणाघात

शुभम शिंदे

व्यापाऱ्यांना फटाका विक्री परवान्यासाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदत

News Desk