HW News Marathi
मुंबई

जय फाउंडेशनच्या स्वच्छता मोहीमेचे 75 आठवडे, इको फ्रेंडली गणेशोत्सवाचा दिला संदेश

मुंबई | गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे मुंबईसह उपनगरात सध्या गणेश आगमनाची धांदल उडालेली पहायला मिळत आहे. परंतु पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन जय फाउंडेशन आणि दादर सांस्कृतिक मंच या सामाजिक संस्थाकडून केले जात आहे. मुंबईच्या प्रचंड लोकसंख्येमुळे मुंबईचे समुद्र किनारे प्रदूषित होत असल्याचे पहायला मिळत आहे. समुद्र किनारी लोकांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या कच-याचे खच या समुद्राच्या सौंदर्याला गालबोट लावत आहेत. अशा वेळी या समुद्र किना-याच्या स्वच्छतेसाठी कुणीतरी पुढाकार घेऊन पुढे येण्याची प्रचंड गरज होती आणि हा पुढाकार दादर परीसरात रहाणा-या एका तरुणाने घेतला. या स्वच्छतेच्या ध्यासाने पछाडलेल्या जयचा एक वेगळा प्रवास सुरु झाला. सुरुवातीला एकट्यापासून सुरुवात करत हा समुद्र किनारा स्वच्छ करायला जय ने सुरुवात केली आणि दादरकरच नव्हे तर संपूर्ण मुंबईतील अनेक लोक विद्यार्थी महाविद्यालये शाळा या स्वच्छता मोहीमेत जोडल्या गेल्या.

जय फाउंडेशनच्या या स्वच्छता मोहीमेला 2 सप्टेंबर ला 75 आठवडे पुर्ण झाले.दादरच्या सुर्यवंशी लेन परीसरात समुद्र किनारी दर रविवारी एक तरुण कचरा गोळा करायचा कालांतराने अनेक लोक जोडले गेले आणि समुद्र किनारी असलेला हा कचरा पुर्णपणे स्वच्छ झाला. सध्या हा समुद्र किनारा स्वच्छ झालेला पहायला मिळत आहे. परंतु दीड वर्षे अनेक हातांनी मेहनत घेऊन स्वच्छ केलेला हा समुद्र किनारा आता स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मुंबईकरांची आहे. गणेशोत्सव अगदीच काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे सध्या पर्यावरण पुरक गणेशोत्सवाबाबत दादर सांस्कृतिक मंच आणि जय फाउंडेशनकडून जनजागृती केली जात आहे.

दादर चौपाटीच्या स्वच्छता मोहीमेचे 75 आठवडे

जय फाउंडेशन कडून गेले 75 आठवडे दादरच्या समुद्र किना-याची स्वच्छता केली जात आहे. जय शृंगारपुरे यांनी स्वच्छता मोहीमेला सुरुवात केल्यापासून ते आत्तापर्यंत दादरच्या समुद्र किनारी जमा झालेल्या कच-यात विक्रमी घट झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. विषेश म्हणजे या स्वच्छता मोहिमेमुळे या ठिकाणी सध्या विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी मुलं गर्दी करताना पहायला मिळतात.

महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाकडे असलेल्या कमी मनुष्यबळामुळे किंवा नागरीकांचा हलर्जी पणा या कच-याला विषेश कारणीभूत आहे. परंतु गेले 75 आठवडे जय फाउंडेशन या समुद्र किनारी मुंबईतील विविध शाळांमध्ये शिवणा-या विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन तसेच तरुण मुला- मुलींच्या अनेक ग्रुपला सोबत घेऊन हे समुद्र किनारे स्वच्छ करताना पहायला मिळत आहे.

जय फाउंडेशनच्या कामाचे कौतुक करण्यासाठी रविवार 2 सप्टेंबर रोजी भाजाचे मुंबई अध्यक्ष अशिष शेलार यांनी दादरच्या समुद्र किना-याला भेट दिली. यावेळी 75 आठवडे स्वच्छता मोहीमेला पुर्ण झाल्यानंतर अशिष शेलार यांच्या हस्ते केक कापून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी देखील दादरच्या समुद्र किनारी पहाणी केली तसेच जय फाउंडेशनच्या कामाचे भरभरुन कौतुक केले. जय फाउंडेशचे संस्थापक अध्यक्ष जय शृगारपुरे यांच्या कौतुका सोबतच सरदेसाई यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करा | जय शृंगारपुरे

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे जय फाउंडेशनकडून आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत, बाप्पाच्या विसर्जनाला येताना कोणत्याही प्रकारचे हार, फुले समुद्रात न सोडता ती महापालिकेने ठेवलेल्या निर्माल्य कलशात टाका. या गणेशोत्सवात जय फाउंडेशनचे स्वयंसेवक मुंबईतील गणेश भक्तांना विसर्जनासाठी लागणारी मदत करतील.

प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या गणेश मुर्तींमुळे पाण्यात रहाणा-या मासे, कासव तसेच तत्सम प्रकारच्या इतर जलचरांना प्लॅस्टर ऑफ पॅरीसचा त्रास होतो त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात एको फ्रेंडली शाडू मातीच्या मुर्ती यंदाच्या गणेशोत्सवात पुजेसाठी वापरा. जास्तीत जास्त प्रमाणात गणेश भक्तांनी पर्यावरण पुरक इको फ्रेंडली तलावाचा विसर्जनासाठी वापर करावा असेही जय शृंगारपुरे यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.

बाप्पाच्या आनंदाची नक्की काळजी घ्या | उत्तरा मोने

जय फाउंडेशन व दादर सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी स्वच्छता मोहीम घेण्यात आली. तेव्हा दादर सांस्कृतीक मंचाच्या अध्यक्ष उत्तरा मोने उपस्थित होत्या. यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करा. आपल्या आनंदापोटी समुद्र किनारे खराब करुन गणपती बाप्पाला दुखावू नका असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापालिका शाळेतील गरीब, गरजवंत व कर्तबगार विद्यार्थ्यांची परदेश वारी

News Desk

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे, वाहतुकीसाठी बंद

News Desk

मोबाइल सावरताना आईने चिमुरडीला दहाव्या मजल्यावरून पाडले

News Desk