HW News Marathi
मुंबई

सोशल मीडियावर ‘परतीचा पाऊस, पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून राज ठाकरेंचे मोदी-शहांना फटकारे

मुंबई | पेट्रोल-डिझेलच्या दर वाढीवरुन भाजप सरकारवर निशाणा साधणारे व्यंगचित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढले आहे. या व्यंगचित्रातून त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी असताना ही मोदीसरकार सर्वसामान्यांकडून जास्त पैसे आकारुन सर्वसामान्य नागरिकांची लूट करत असल्याचे व्यंगचित्रातून दाखवण्याच प्रयत्न केला आहे.

  • व्यंगचित्रात काय दाखविले

https://www.facebook.com/RajThackeray/posts/321855818345574

जगात तेलाच्या किमती खाली घसरल्या असताना सुद्धा, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी आजपर्यंतचा उच्चांक गाठला आहे.

या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे दोघेही जण पेट्रोल पंपावर उभे असून एका सर्वसामान्य नागरिकाच्या गाडीतील दाम्पत्यांना धमकावत असल्याचे व्यंगचित्रात दाखवले आहे. हँइस अप !, निकाल पैसा !’ असे शब्द मोदीनी गाडीत बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी काढले आहेत.

या व्यंगचित्रातून मोदी हे एका सराईत गुंडाप्रमाणे पेट्रोल—डिझेलचे दर वाढीच्या स्वरुपात सर्वसामान्य नागरिकाकडून पैसे वसूल करत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या गाडी मागे एक व्यक्ती गाडीतून बाहेर आला. त्या व्यक्तीने डोक्याला हात लावून बाबांनो, हेच ते अच्छे दिन !’ असे वाक्य म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवाजी पार्क येथे ६० वर्षीय रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

लोणावळ्यात इंजिनिअर प्रेमी युगलाचा निर्घुण खून

News Desk

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेननप्रमाणे भिडे, एकबोटेवर कारवाई कराः प्रकाश आंबेडकर

News Desk
महाराष्ट्र

गौतम गंभीरचे शाहीद आफ्रिदीला ट्विटरवर चोख प्रत्युत्तर

News Desk

मुंबई | पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर जम्मू-कश्मीरमध्ये परिस्थतीसाठी भारत जबाबदार धरले होते, असे वादग्रस्त ट्विट केले होते. त्यानंतर भारतीय क्रिकेटर गौतम गंभीर यांनी आफ्रिदीच्या ट्विटकरुन चोख प्रत्युत्तर दिले.

“भारतव्याप्त कश्मीरची परिस्थती अस्वस्थ करणारी आणि चिंताजनक आहे. आत्मसन्मान आणि स्वातंत्र्यासाठी आवाज उठवणाऱ्या निष्पापांवर गोळ्या झाडल्या जात आहेत. संयुक्त राष्ट्र आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघटना कुठे आहेत? या संघटना हा रक्तपात थांबवण्यासाठी ते कोणतेच पावले उचलत नाहीत?” शाहिद आफ्रिदी याने असे वादग्रस्त ट्विट केले.

या ट्विट केल्यानंतर पुन्हा एकदा ट्विट करुन भारतीय तिरंग्यासोबत फोटो टाकला. “आम्ही प्रत्येक सन्मान करतो. हा फोटा खऱ्या खेळाडूचे उत्तम उदाहरण आहे. जेव्हा मानवाधिकाराचा मुद्दा येतो. तेव्हा तो आमच्या निरागस काश्मीरीयांनाही लागू व्हावा” असे ट्विट शाहीद आफ्रिदी यांने केले होते.

आफ्रिदीच्या ट्विटनंतर वादाला तोंड फूटले. त्यानंतर ट्विटरवर आफ्रिदीला नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. भारतीय क्रिकेटर गौतम गंभीर याला काही पत्रकारांनी फोन करुन आफ्रिदीच्या विधाना बदल विचारणा केली.

 

“मला काही पत्रकारांनी फोन करुन आफ्रिदीच्या कश्मीर आणि यूएन बदल केलेल्या विधाना संदर्भात विचारणा केली. पण, त्याच्याबदल बोलण्यासारखे काय आहे? आफ्रिदीला यूएन यांचा अर्थ सुद्धा माहिती नसेल. आफ्रिदीला वाटले असेल की, यूएन म्हणजे ‘अंडर नाईन्टिन’ आहे. यांच्या पलिकडे त्याला काहीच माहिती नाही. माध्यमांनी त्याला फार सीरियस घेऊ नये, तो नो बॉलवर विकेट साजरी करतोय,” अशा शब्दात गौतम गंभीर यांनी ट्विटरवरुन आफ्रिदीवर टीका केली.

Related posts

विरोधी पक्षात बसून ‘मळमळ’ ओकण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती !

News Desk

मुंबईत आज १८९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, मुंबईचा आकडा १०००च्या पुढे

News Desk

PandharpurElection : फडणवीसांवर इतका अविश्वास दाखवणं बरं नाही, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य

News Desk