HW News Marathi
मुंबई

मुंबई महापालिकेतील मनसेचे नगरसेवक फुटणार ? 

मुंबई – शिवसेना काही नगरसेवकांना कोट्यवधीची अमिष दाखवून फोडण्याचे षड्यंत्र रचत असल्याची तक्रार भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर आता मनसेही मैदानात उतरली आहे. मनसेनेही कोकण विभागीय आयुक्तांना पत्र लिहून मनसेचे काही नगरसेवक वेगळा गट स्थापन करण्याची तयारी करत आहेत. त्यांना वेगळा गट स्थापण्यासाठी परवानगी देवू नये असे पत्र पक्षाचे सरचिटणिस गिरीष सावंत यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहे.

मनसेचे मुंबई महापालिकेत ७ सदस्य असून त्यांचा गटाची नोंदणी करण्यात आली आहे. मात्र काही राजकीय पक्ष प्रलोभने दाखवून वेगळा गट स्थापन करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. अशा गैरप्रकारामुळे लोकशाही मुल्यांची पायमल्ली होत असल्यामुळे नव्या गटाला मान्यता देवू नये. शिवाय कोणताही निर्णय घेण्या आधी मनसे नेत्यांना चर्चा करण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी सावंत यांनी पत्रातून केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परप्रांतीयांनी काम न केल्याने मुंबई बंद पडणार नाही | आठवले

News Desk

मेट्रोचे खांब उभारण्याची मागणी न्यायालयाने नाकारली

Gauri Tilekar

‘मविआ’च्या महामोर्चात ठाण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा हजार कार्यकर्ते सहभागी होणार

Aprna