HW News Marathi
मुंबई

मोटरमनच्या ‘त्या’ कृत्याला रेल्वे प्रशासन जबाबदार

मुंबई | मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेनमध्ये थक्क करणारा प्रकार घडला आहे. मध्य रेल्वेच्या खोळंब्याने प्रवाशांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागतो. तांत्रिक बिघाडामुळे लोकल वाहतुकीची कोंडी आणि त्यामुळे होणारा त्रास सहन करावा लागतो.आता मध्य रेल्वे ही तांत्रिक बिघाडामुळे नव्हे तर चक्क मोटरमनमुळे चर्चेत आली आहे. ती म्हणजे सीएसएमटीकडे निघालेल्या लोकल ट्रेनमधून उतरून एका मोटरमनने लोकलसमोरच लघुशंका केल्याचा व्हिडिओ सध्याच व्हायरल होत आहे.

हा संपूर्ण प्रकार बुधवारी (१८ जुलै) सकाळी उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी स्टेशनच्या दरम्यान लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने अपघात झाला होता. त्यावेळी सर्व लोकल विविध ठिकाणी थांबवण्यात आल्या होत्या. त्याचवेळी हा संपूर्ण प्रकार घडला आहे. या प्रकारनंतर सर्व स्तरातून मोटरमनवर टीका होऊ लागल्या होत्या. ट्रेन थांबवून रुळावर उतरून लघुशंका केली आणि तोपर्यंत लाखो चाकरमानी ट्रेन सुरळीत सुरू होण्याची वाट बघत होते. मोटरमनने केलेले हे कृत्य चुकीचेच आहे. परंतु मोटरमनसाठी रेल्वेत टॉयलेटच नाहीत त्यामुळेच दुसरा पर्याय नसल्याने त्याने रेल्वे थांबवून रूळावर लघुशंका केली.

मध्य रेल्वेच्या मोटरमन आणि सुरक्षा रक्षकांनी ४ ऑक्टोबर २०१८ रोजी मुंबई मध्य रेल्वे प्रशासनाला लिहिलेल्या एका पत्रामुळे या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेत प्राथमिक सुविधाच नसल्याचे समोर आले आहे. रेल्वे सुरू असताना मोटरमन आणि सुरक्षा रक्षकांसाठी रेल्वेत टॉयलेटची व्यवस्था नाही. त्यामुळे हे कर्मचारी कामावर असताना पाणीच पीत नाहीत. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व कारणांमुळे कर्मचाऱ्यांनी ४ ऑक्टोंबर २०१८ रोजी मुंबई मध्य रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून आपल्या समस्या कळविल्या होत्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांकडून लोकशाहीला काळीमा फासण्याचा प्रयत्न | विखे पाटील

News Desk

मुंबई मेट्रोचा मासिक पास महागला

News Desk

मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा विजयी शुभारंभ

News Desk