HW News Marathi
मुंबई

मुळा नदीचे पाणी झोपडपट्टीत शिरले; नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

पिंपरी : गेल्या तीन दिवसांपासून पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. पुणे आणि परिसरातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यातच मुळशी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने जुनी सांगवी येथील मुळा नदीपात्राशेजारच्या मुळानगर झोपडपट्टीत पाणी शिरलेआहे. त्यामुळे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने २० झोपडपट्टयांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे, अशी माहिती पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

मुसळधार पावसामुळे मावळ आणि मुळशीतील धरणे फुल झाली आहेत. पिंपरी-चिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण फुल झाल्याने मंगळवारपासून विसर्ग वाढविण्यात आला आहे. मावळातील वलवण, भुशी, लोणावळा डॅम फुल झाले आहेत. भामा आसखेडही फुल झाले आहे. पवना, मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मंगळवारी मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तीस हजार क्युसेक पाणी मुळा नदीत सोडण्यात आले आहे. पवना

नदीची पाणीपातळी वाढली आहे. धरणातून सात हजार आठशे क्युसेक पाणी सोडले आहे. त्यामुळे चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले होते. पिंपरीतील नदीकाठच्या परिसरात सर्तकतेचा इशारा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीस असल्याचे भासवून तीन विद्यार्थ्यांना लुटले

News Desk

मुख्यमंत्र्यांनी भिडे यांच्या नावाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला…

News Desk

मध्य रेल्वेवर रविवार देखभालीच्या काम करण्यासाठी ठाणे-कल्याण अप-डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक

Aprna