HW Marathi
मुंबई राजकारण

महाराष्ट्रात कोरोनाबाधितंचा आकडा ८९ वर

coronavirus

मुंबई |  कोरोनाबाधितांची संख्या मुंबईत वाढतच आहे. महाराष्ट्रात आता कोरोनाग्रस्तांचा आकडा ८९ वर गेला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईत १४ तर पुण्यात १ नवीन कोरोना पॉझिटिविह रुग्ण आढळला आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं घोषित केलेली जमावबंदी रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झाली आहे. प्रत्येक शहरात पोलीस गस्त घालत असून सरकारच्या आदेशाचं पालन व्हावे, यासाठी काळजी घेत आहेत.

दरम्यान, जारी केलेल्या जमावबंदीला मुंबईकर महत्त्व देत नसून कारण नसतानाही ते रस्त्यावर फिरत आहेत. पोलीस रात्रंदिवस गस्त घालत आपली रक्षा करत आहेत आणि एक सुजाण नागरिक म्हणून आपण घरात राहून आपली काळजी घ्यायला हवी आहे. लवकरात लवकर हे संकट टळून जाण्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्नशील राहण गरजेचे आहे.

 

 

Related posts

वारीस पठाणांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर अंधेरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल

अपर्णा गोतपागर

माझ्या मनात ईव्हीएमबाबत कोणतीही शंका नाही !

News Desk

निवडणुकांसाठी मोदींचे हे खालच्या पातळीचे राजकारण | निरुपम

Gauri Tilekar