HW Marathi
Covid-19 मुंबई

मुंबई लोकलची संख्या वाढवली, तब्बल ३५० लोकल रुळावर

मुंबई | केंद्र सरकार आणि वेगवेगळी कार्यालये-आस्थापना, उच्च न्यायालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक यामधील कर्मचाऱ्यांना लोकलचा प्रवास करता येणार आहे. त्यामुळे आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्य सरकारने रेल्वे मंत्र्यालयाकडे राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारच्या आणि वेगवेगळ्या कार्यालयातील कर्मचारी आणि सार्वजनिक बँक कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याबाबत विनंती करण्यात आली.

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आजपासून ३५० लोकल धावणार आहेत. यात आवश्यक कर्मचारी, केंद्र, आयटी, जीएसटी, सीमाशुल्क, टपाल, राष्ट्रीयकृत बँका, एमबीपीटी, न्यायपालिका, संरक्षण आणि राजभवनाच्या कर्मचार्‍यांना प्रवास करता येणार आहे. सर्वसामान्यांना मात्र अद्याप लोकलमधून प्रवास करता येणार नाही.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबतच संरक्षण विभाग, आयकर विभाग, जीएसटी, कस्टम, पोस्ट खात्यातील कर्मचारीही लोकलमधून प्रवास करु शकतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर एकूण २०० लोकल फेऱ्या होतात. त्यात आणखी १५० फेऱ्यांची भर पडली आहे. त्यामुळे १ जुलैपासून मध्य रेल्वेवर ३५० लोकल फेऱ्या होतील अशी माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली.

Related posts

मुंबईच्या नेपीएन्सी रोडवरील इमारतीला लागली आग, कोणतीही जीवितहानी नाही

News Desk

डॉ. आंबेडकराचे परळमधील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित

News Desk

पंचवटी एक्स्प्रेसचे डबे मागे सोडून इंजिन पुढे धावले, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk