HW News Marathi
मुंबई

महापौरांचा अरेरावीपणा, महिलेचा हात मुरगळत केली दमदाटी

मुंबई | यंदाच्या पावसाळ्यात मुंबईसह उपनगरला जोरदार पावसाने चांगलंच झोडपले आहे. दरम्यान, मुंबईत पाऊस कितीही पडला तरीही दर पावसाळ्यात मुंबईची दुरावस्था होणे हे आता नेहमीचेच झाले आहे. परंतु, मुंबईकरांना सामोरे जावे लागणाऱ्या या समस्यांचे मुंबई महानगरपालिकेला काहीही सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे. उलट त्यांचा अरेरावीपणा दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे जाब विचारणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या गराड्यात अडकलेल्या महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी लोकांच्या समस्या, प्रश्न, तक्रारी असे समजून, ऐकून न घेता एका महिलेशी केलेले अरेरावीपणाचे वर्तन !

नेमका काय प्रकार घडला ?

सांताक्रूझ येथील गोळीबार परिसरात रविवारी (४ ऑगस्ट) सकाळी विजेच्या झटक्याने ५५ वर्षीय माला नागम आणि त्यांचा २६ वर्षीय मुलगा संकेत या दोघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर येथील स्थानिक रहिवाशांमध्ये अत्यंत नाराजीचे वातावरण होते. “जोरदार पावसामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी पोचल्यानंतर सुरक्षितता म्हणून येथील वीजप्रवाह खंडित का केला नाही ?”, असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून विचारण्यात येत होता. याच पार्श्वभूमीवर, सोमवारी (५ ऑगस्ट) दुपारी विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांताक्रूझमधील या विभागाला भेट दिली. यावेळी येथील संतप्त स्थानिकांनी आणि विशेषतः महिलांनी महापौरांभोवती गराडा घातला आणि प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.

महिलेचा हात मुरगळत दमदाटी

संतप्त नागरिकांच्या कोणत्याही प्रश्नाला समाधानकारक उत्तर न देता उलट महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर महापौर महाडेश्वर यांनी या संतप्त नागरिकांपैकी एका महिलेचा चक्क हात मुरगळत “मी कोण आहे ते तुला माहित नाही” असे म्हणत धमकीही दिली. इतक्या महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या अशा महापौरपदावर असणाऱ्या विश्वनाथ महाडेश्वर यांचे नागरिकांशी विशेषतः एका महिलेशी हे असे वर्तन शोभनीय आहे का ? या प्रकारानंतर त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई का झाली नाही ?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत ISIS चा संशयित अबु झैदला अटक,

News Desk

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो | राज ठाकरेंची टिप्पणी

News Desk

मध्य-हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

News Desk