HW News Marathi
मुंबई

मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर झाड पडले

मुंबई | गेले दोन दिवस काहीशी विश्रांती घेणाऱ्या पावसाने आज (६ जुलै) मध्यरात्रीपासून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार हजेरी लावली आहे. मुलुंड स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ओव्हरहेड वायरवर झाड पडले आहे. यामुळे मध्य रेल्वेची डाऊन दिशेची म्हणजेच सीएसएमटीवरून कल्याणकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

हे झाड लोकल ट्रेनच्या पेंटोग्राफमध्ये अडकल्याने आणखीनच पंचाईत झाली होती. यामुळे अप दिशेच्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला असून प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार डाऊन दिशेकडील लोकल ट्रेन किमान ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत. तर सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन किमान १० मिनिटे उशिराने धावत आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकल ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना मृत्यू झाल्यास रेल्वेकडून नुकसान भरपाई

swarit

सीएनजी, पीएनजीचे भाव वधारले

News Desk

काळ्या पैशावाल्यांसाठी धोक्याची घंटा

News Desk