मुंबई | सलग दुसऱ्या दिवशी देखील पावसाने मुंबईसह उपनगरात दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत आज (२९ जून) सकाळपासून जोरदार पाऊस पडत असून मुंबईतील रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक या दोन्ही सेवांवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे तिन्ही रेल्वे मार्गांवरील लोकलसेवा खोळंबली मध्य रेल्वे १५ मिनिटे उशिराने सुरु, वाढता पाऊस आणि सुट्टी पाहता लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्याची शक्यता आहे. हार्बर आणि पश्चिम रेल्वे १० ते १५ मिनिटे उशिराने आहे.
According to BMC, Mumbai City received 127 mm rainfall, western suburbs received 170 mm rainfall and eastern suburbs received 197mm rainfall, in last 24 hours; According to IMD, heavy rainfall is expected in #Mumbai today. pic.twitter.com/bETXXFh1F1
— ANI (@ANI) June 29, 2019
मुंबईतील चेंबूर परिसरात काल (२८ जून) रात्री भिंत कोसळून पार्किंगला उभ्या असणाऱ्या रिक्षावर कोसळली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. पुढील २४ तासांत मुंबई, ठाणे, कोकण परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच भिंवडीतील काही भागांमध्ये विज पुरवठा खंडित केला आहे. पावसामुळे पश्चिम मार्गावरील एक्स्प्रेस गाड्यावर परिणाम झाला आहे.
India Meteorological Department, Mumbai: Very active monsoon conditions over west coast, with deep westerlies. Heavy rainfall expected in #Mumbai, #Thane & around west coast. pic.twitter.com/ElwYKnF4Gj
— ANI (@ANI) June 29, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.