HW News Marathi
मुंबई

मध्य, पश्चिमसह हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबई। मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज (२५ ऑगस्ट) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे आज लोकल फेऱ्या कमी चालविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे सुट्टीच्या दिवशीही हाल होणार आहेत.

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे यादरम्यान सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर आज सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत कल्याणहून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या लोकल कल्याण ते ठाणेदरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. सकाळी १०.१६ ते दुपारी ३.२२ पर्यंत सीएसएमटीहून कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल संबंधित थांब्यासह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा या स्थानकांवरही थांबणार आहे

पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते भाईंदर या स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येईल. त्यानुसार आज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बोरीवली ते भाईंदर यादरम्यान दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान दोन्ही दिशेकडील जलद मार्गावरील लोकल विरार- वसई रोड ते बोरीवलीपर्यंत धिम्या मार्गावरून चालविण्यात येतील.

हार्बर मार्गावरील कुर्ला आणि वाशीदरम्यान दोन्ही दिशेकडे सकाळी ११.१० ते ३.४० पर्यंत एकही लोकल धावणार नाही. सकाळी १०.३४ ते दुपारी ३.०८ वाजेपर्यंत सीएसएमटीहून वाशी-बेलापूर- पनवेलकडे व सकाळी १०.२१ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पनवेल-बेलापूर- वाशीहून सीएसएमटीकडे लोकल धावणार नाही. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते पनवेल-वाशी, कुर्लादरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदार संजय राऊत यांच्यावर बेळगावमध्ये गुन्हा दाखल

News Desk

कपाडिया नगर परिसरातील पुलाचा भाग कोसळला

swarit

मुंबईतल्या ५०० फुटांपर्यतच्या घरांना करमाफी

News Desk