HW Marathi
मुंबई

मुंबईकरांना घडणार पाच उपवास, डबेवाले जाणार सुट्टीवर

विशाल पाटील ।  संपूर्ण मुंबईला डबे पोहचवणारे मुंबईचे डबेवाले पाच दिवसाच्या सुट्टीवर जाणार आहेत. १५ एप्रिल ते २० एप्रिल पर्यंत डबेवाले सुट्टीवर असणार आहेत. मुंबईतील डेबेवाला संघटनांकडून जाहीर करण्यात आले आहे. या काळात अनेकांना सुट्टी असतात. तसेच यादरम्यान अनेक डबेवाल्यांच्या गावी यात्रेसाठी जायाचे असते. त्यामुळे डबेवाले ५ दिवसाच्या सुट्टीवर असणार आहेत.

मुंबई डबेवाला असोशिएशन संम्रभ करत आहेत असा, आरोप मुंबई डबेवाला मंडळाकडून करण्यात आला आहे. मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सुद्धा सुट्टीची घोषणा जाहीर केली आहे .मुंबईतील जुनी आणि विश्वासनीय अशी ओळख मुंबई डबेवाला मंडळाची आहे. जवळपास या मंडळाला १२८ वर्षे पूर्ण झाली आहेत.

या मंडळ्याचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी एच. डब्ल्यूशी बोलताना सांगितले की, मुंबई डबेवाला असोशिएशन ही डबेवाल्यांमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहे. तसेच यांच्याबरोबर कोणीही डबेवाले नाही आहेत, ते संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत. त्यांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन त्यांनी मुंबईकरांना केले आहे. या सुट्टीवरून डबेवाला संघटनांमधील गोंधळ आणि आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र, या पाच दिवसासाठी मुंबईकरांना काही हक्काचा डबा मिळणार नाही.

Related posts

रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा, भिंत पडल्याने कुर्ल्यात तीन जण जखमी

News Desk

मुंबई विद्यापीठाला ठोकले टाळे

News Desk

मराठी भाषा दिनीच मराठी शाळा बंद करण्याचे फर्मान!

News Desk