HW News Marathi
मुंबई

मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू

मुंबई | कोरोनामुळे इतके महिने सर्व काही ठप्प झालं होतं. आता सर्व काही बाबी रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई विद्यापीठातील प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यासंबंधी वेळापत्रक देखील विद्यापीठाने जारी केले आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे.

काय करणे आवश्यक?

विद्यार्थ्यांनी हमीपत्र भरून कोणत्याही एका महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. महाविद्यालयांनी हमीपत्राच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे तात्पुरते प्रवेश निश्चित करून विद्यार्थ्यांनी कागदपत्रांच्या मुळ प्रती सादर केल्यावर अंतिम प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती टाळण्यासाठी महाविद्यालयांनी ऑनलाईन प्रक्रियेचा उपयोग करावा. तसेच, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातील महाविद्यालयांना प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी येत असल्यास व प्रतिबंधित क्षेत्रात मोडत नसल्यास सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करून ऑफलाईन प्रक्रिया राबवू शकतात.

वेळापत्रक –

* अर्ज विक्री – २४ जुलै ते ४ ऑगस्ट २०२० पर्यंत

* प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया – २२ जुलै ते ४ ऑगस्ट (१ वाजेपर्यंत)

* एडमिशन फॉर्म सादर करण्याची तारीख – २७ जुलै ते ४ ऑगस्ट (३ वाजेपर्यंत) (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस अॅडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.

* पहिली मेरीट लिस्ट –४ ऑगस्ट ( सायंकाळी ७ वाजता)

कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – ५ ते १० ऑगस्ट (दुपारी ३ वाजेपर्यंत )

* द्वितीय मेरीट लिस्ट – १० ऑगस्ट ( सायंकाळी ७ वाजता)

कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – ११ ते १७ऑगस्ट (दुपारी ३ वाजेपर्यंत )

* तृतीय मेरीट लिस्ट – १७ ऑगस्ट ( सायंकाळी ७ वाजता)

कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – १८ ते २१ ऑगस्ट (दुपारी ३ वाजेपर्यंत )

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

पश्चिम रेल्वेकडे सहा नवी सेगवे वाहने, सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल

News Desk

ही आपत्कालीन परिस्थिती, पालिकेला दोष देऊन चालणार नाही !

News Desk